बालमित्रांनो, तुम्ही ‘यक्षभूमीचा जादुगार’ हे पुस्तक वाचले आहे ना! सुमारे १०० वर्षांपूर्वी एल. फ्रांक. बाउम या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या अत्यंत लोकप्रिय कादंबरीचा-‘The Wonderful Wizard of Oz’-चा तो अनुवाद होता. आता आम्ही मराठी वाचकांसाठी सादर करीत आहो याच लेखकाच्या दुसऱ्या कादंबरीचे मराठी रूपांतर-‘यक्षभूमीची नवलकथा’.
या कादंबरीत तुम्हाला भेटतील काही लोकविलक्षण पात्रे.
जग्गू भोपळशिरे : अर्थात भोपळ्याचे डोके असलेला जग्गू-
लाकडोजी: अर्थात लाकडाचे शरीर असलेला धावणारा घोडा-
कप्तान जीजी : अर्थात पुरुष राज्य संपविलेच पाहिजे म्हणून लढणारी शूर मुलगी
वि. वि. भू. : अर्थात अतीविशाल विद्या विभूषित कीटक-
गरुडेश : अर्थात गरुडाचे डोके असलेले विमान-
अशा अद्भुत पात्रांनी भरलेले व चित्रकार राजा बडसल यांच्या अप्रतीम रेखाटनांनी सजलेले पुस्तक.

विजय पाडळकर यांचे ललित साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे. त्यांची भाषाशैली, शब्दसंपदा, वाचकांना गुंगवून टाकणारे लेखन कौशल्य, यांविषयी लिहावे तेवढे थोडेच. या पुस्तकांत बाल वाचकांसाठी पाडळकर यांनी घेतलेले परिश्रम पानापानातून जाणवतात. त्यासाठी लेखकाला सलाम. पुस्तकाचे सुंदर रंगीत मुखपृष्ठ, उत्तम छपाई, रेखाचित्रे यांनी पुस्तकांना देखणे रूप दिले आहे. प्रकाशकाचेही अभिनंदन..
---रेणू गावस्कर (महाराष्ट्र टाईम्स २२/११/२०२०)