पॉप्युलर प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई
प्रथमावृत्ती: २०११
|
किंमत: १५०/-
पृष्ठे: १२०
|
गुलजार हे चतुरस्र व्यक्तिमत्व आहे. ते चित्रपट गीतकार आहेत, कथाकार आहेत, चित्रपटाचे कुशल संकलक, पटकथाकार, दिग्दर्शक आहेत. अनेक दूरदर्शन मालिका आणि लघुपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. ते उत्तम वाचक आहेत, संगीताचे उत्तम जाणकार आहेत. त्यांच्या बोटात सतार वादनाचे कौशल्य आहे व रंगांची जादूही. या साऱ्या विविध रूपांच्या मुळाशी असणारे त्यांचे खरे रूप एका उत्कट कवीचे आहे.
‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ या पुस्तकात विजय पाडळकर यांनी अनुवादित केलेल्या गुलजार यांच्या ६४ कविता आणि २४ त्रिवेणी एकत्रित केल्या आहेत.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध रंगकर्मी आणि कवी किशोर कदम लिहितात-
‘ज्यांच्या संपूर्ण अस्तित्त्वामध्ये कविताच डुंबून गेलेली जाणवते त्या गुलजार साहेबांच्या कवितांचा अनुवाद, जागतिक साहित्याचा अभ्यास असणाऱ्या विजय पाडळकर यांच्यासारख्या रसिकाने करावा ही मराठी साहित्यातील एक घटनाच मानायला हवी..कवी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जातो तेव्हा मूळ कवी आणि अनुवादक एकमेकात संपूर्णपणे संक्रमित व्हावे लागतात. सदर अनुवाद हा त्याचाच विलक्षण अनुभव आहे. गुलजार साहेबांच्या कविता मराठीत येण्याचे स्वप्न आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं...पुन्हा पुन्हा पाहिलं होतं..तेच स्वप्न आता रसिकांच्या तळहाती आहे.’

प्रिय विणकरा
मलाही तुझे कौशल्य शिकव
प्रिय विणकरा
नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना
जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो
तेव्हा दुसरा धागा त्यामध्ये गुंफून
तू पुढे विणू लागतोस.
तुझ्या या वस्त्रांत पण
एकही गाठ कुणाला दिसत नाही.
मी तर फक्त एकदाच विणू पाहिलं होतं
एका नात्याचं वस्त्र
पण त्याच्या साऱ्या गाठी स्पष्ट दिसताहेत
प्रिय विणकरा.
प्रिय विणकरा
नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना
जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो
तेव्हा दुसरा धागा त्यामध्ये गुंफून
तू पुढे विणू लागतोस.
तुझ्या या वस्त्रांत पण
एकही गाठ कुणाला दिसत नाही.
मी तर फक्त एकदाच विणू पाहिलं होतं
एका नात्याचं वस्त्र
पण त्याच्या साऱ्या गाठी स्पष्ट दिसताहेत
प्रिय विणकरा.
त्रिवेणी
एक तंबू लागला आहे सर्कसचा
झोपाळ्यावर झुलत राहतात कलाकार
मन कधी रिकामं नसतंच.
उडून जाणाऱ्या पाखराने एवढेच पाहिले
बराच वेळ हात हलवीत होती फांदी
निरोप देण्यासाठी की जवळ बोलावण्यासाठी?
मोजून मापून काळ भरला जातो वाळूच्या घड्याळात
रिकामं झालं की त्याला उलटलं जातं
आयुष्य सरल्यावर मला तो उलटं नाही का करू शकणार?

बचाव
पावसाळा येण्यापूर्वीच
पावसापासून बचाव करण्याची तयारी सुरू आहे.
साऱ्या फटी बुजवून घेतल्या आहेत
छत लिंपून घेतले आहे
छत्रीही दुरुस्त केली आहे
बाहेरच्या बाजूस उघडणाऱ्या खिडकीवर
एक सज्जा करून घेतला आहे
मुख्य रस्त्यावरून, गल्लीतून, दरवाजापर्यंत येणारा रस्ता
जाड माती टाकून पक्का केला जात आहे
काही खड्ड्यात पाउस पडला की
पाणी साचते
पाय, बूट, मोजे सारे भिजून जातात.
इंद्रधनुष्य गळ्यात तर पडणार नाही ना
मेघ भिजविणार तर नाहीत ना
श्रावणापासून स्वत:ला सांभाळत जगतो आहे