अर्पणपत्रिका:
मोहन सोहनी आणि जयंत राळेरासकर यांना,
गाण्यांच्या प्रदेशातील सहल तुमच्यामुळे अधिकच सुहानी झाली .

हिंदी चित्रपट गीते हा जनसामान्याच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय असला तरी गीतकारांबद्दल रसिकांत प्रचंड अज्ञान आहे. बहुसंख्य रसिक त्यांच्या आवडीची पंचेवीस गीते सांगू शकतील, त्यांचे गायक-गायिका, चित्रपट आणि संगीतकार देखील सांगू शकतील पण दहा गीतांचेही गीतकार ते सांगू शकणार नाहीत. ही उपेक्षा काही अंशी तरी कमी व्हावी म्हणून विजय पाडळकरांनी ‘बखर गीतकारांची’ हे पुस्तक लिहिले. त्यांतील शैलेन्द्र वरील लेख लिहित असताना त्यांना जाणवले की हा एका दीर्घ पुस्तकाचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी या विषयाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. शैलेंद्र त्यांचा लहानपणापासून आवडता कवी होता. आता त्यांनी त्याच्या सुमारे ८०० गीतांपैकी ६५० गीते मिळविली, त्याच्या जीवनाविषयी माहिती गोळा केली, जाणकारांबरोबर त्याची चर्चा केली व हा ग्रंथ सिद्ध केला.
गाण्यांचे चित्रीकरण हा सिने गीतांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. उत्तम चित्रण असेल तर अनेक गीतांच्या सोन्याला सुगंध लाभतो. पाडळकरांनी या पुस्तकांत राज कपूर, बिमलदा, विजय आनंद यांसारख्या दिग्दर्शकांनी शैलेन्द्र्ची गीते पडद्यावर कशी फुलविली आहेत याचेही विवेचन केले आहे. अनेक मान्यवरांनी शैलेन्द्रचे जे मूल्यमापन केले आहे त्याचा आढावाही कथानकाच्या ओघात त्यांनी घेतला आहे. शैलेंद्र हा सर्वश्रेष्ठ गीतकार का आहे हे सांगताना गुलजार लिहितात, ‘माझ्या मते चित्रपट हे नाटक आणि कविता यांच्यापेक्षा वेगळे माध्यम आहे हे शैलेन्द्र यांनी जाणले होते, व त्यानुसार त्यांनी स्वत:ला जुळवून घेतले होते. चित्रपटातील प्रसंग व पात्रे समजून घेणे व त्यांच्या भाषेत लिहिणे या कलेत त्यांचा हात धरणारा कुणी नाही. फक्त तेच ‘चित्रपट माध्यमाचा’ एक भाग बनलेले दिसतात, बाकी सारे सिनेमासाठी लिहिणारे कवी आहेत.’
शैलेन्द्रच्या सर्व गीतांची कालक्रमानुसार सूची हे या पुस्तकाचे मोठेच वैशिष्ट्य आहे.