बालमित्रांनो, तुम्हाला काय हवे आहे?
ज्याला जे हवे ते त्याला मिळवून देणाऱ्या एका जादुगाराची व तुमची गाठ आम्ही घालून देत आहो.
तुमच्यासारखीच आणखी काही मंडळी होती.
एक घाबरट सिंह : ज्याला धैर्य हवे होते.
एक बुजगावणे : ज्याला मेंदू हवा होता.
एक पत्र्याचा माणूस : ज्याला हृदय हवे होते.
एक मुलगी : जी आपले हरवलेले घर शोधीत होती.
एक महा-जादुगार या सर्वांना जे हवे ते कसे मिळवून देतो
याची ही अत्यंत मनोरंजक कहाणी.
ही कहाणी मूळची अमेरिकन. एल. फ्रांक बाउम नावाच्या लेखकाने ही कहाणी १९०० साली लिहिली. तिचे नाव ‘The Wonderful Wizard of Oz’. ती अत्यंत लोकप्रिय बनली. इतकी की आजवर तिच्या पन्नास लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. या कहाणीवर ‘Wizard of Oz’ या नावाचा अप्रतीम सिनेमाही निघाला. ती कहाणी मराठी मुलांसाठी भारतीय रुपडे घालून खास आणली आहे.
चित्रकार राजा बडसल यांच्या अप्रतीम रेखाटनांनी सजलेले पुस्तक.

विजय पाडळकर यांचे ललित साहित्यातील योगदान सर्वश्रुत आहे. त्यांची भाषाशैली, शब्दसंपदा, वाचकांना गुंगवून टाकणारे लेखन कौशल्य, यांविषयी लिहावे तेवढे थोडेच. या पुस्तकांत बाल वाचकांसाठी पाडळकर यांनी घेतलेले परिश्रम पानापानातून जाणवतात. त्यासाठी लेखकाला सलाम. पुस्तकाचे सुंदर रंगीत मुखपृष्ठ, उत्तम छपाई, रेखाचित्रे यांनी पुस्तकांना देखणे रूप दिले आहे. प्रकाशकाचेही अभिनंदन..
---रेणू गावस्कर (महाराष्ट्र टाईम्स २२/११/२०२०)