Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

नाव आहे चाललेली...

प्रकाशक: राजहंस प्रकाशन, मुंबई

प्रथमावृत्ती: २००४

किंमत: १००/-

पृष्ठे: १२०
अर्पणपत्रिका : सौ पुष्पास-
ही नाव चालली आहे ती तुझ्यामुळेच.

विजय पाडळकर यांनी ‘‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट’’ मधील ‘फिल्म अप्रिसिएशन कोर्स’ करताना त्या कोर्स मधील ‘साहित्याचे चित्रपटीकरण’ या विषयाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या साहित्य कृतीचे चित्रपटात रूपांतर होत असतांना तिच्यात कसे बदल होतात, ते का होतात आणि त्यामुळे दोन्ही कलाकृतींचा प्रभाव कसा वेगवेगळा जाणवतो ही अधिक अभ्यासाची दिशा आहे असे त्यांच्या ध्यानात आले. सत्यजित राय यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बहुतेक चित्रपट गाजलेल्या साहित्य कृतींवर आधारित आहेत. या दृष्टीने या  महान दिग्दर्शकाच्या कार्याचे अवलोकन करावे म्हणून  पाडळकरांनी राय यांच्या गाजलेल्या ‘अप्पू त्रिवेणी’चा अभ्यास करण्याचे ठरविले. हे चित्रपट तर अनेकदा पहिलेच शिवाय ते ज्या कादंबऱ्यावर आधारित आहेत त्या कादंबऱ्या मिळवून वाचल्या.

एकाच बीजातून वर आलेल्या दोन कलाकृती एकमेकांपासून किती व का भिन्न होतात याचा अभ्यासपूर्ण  आलेख त्यांनी ‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकात सादर केला आहे.

‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती राजहंस प्रकाशन तर्फे ‘गगन समुद्री बिंबले’ या नावाने डिसेंबर २०१६ मध्ये प्रकाशित झाली आहे.
आपले लेखन प्रभावी आहे. लेखनामागची नजर वेगळी आहे.आपण फार गंभीरपणे सिनेमाकडे बघता, विचार करता, मांडता हे प्रकर्षाने जाणवते. असे लेखन मराठीत अभावाने होते, त्यामुळे या लेखनाला वेगळे महत्त्व आहे. दुर्दैवाने अशा लेखनाची मराठीत फार मोठी परंपरा नसल्यामुळे यासाठीचा वाचकवर्ग पुरेशा प्रमाणात सिद्ध झालेला नाही. आजही बहुतांशी लेखक हे वरवरचे, गॉसिपच्या अंगाने जाणारे, सिनेमाविषयी ‘समज’ पेक्षा ‘गैरसमज’ वाढवणारे लेखन करताना दिसतात. म्हणून आपले लेखन पुस्तकात यावे असे मला वाटते.

---दिलीप माजगावकर (प्रकाशक)
'नाव आहे चाललेली’ सारखे एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. साहित्य आणि चित्रपट यांचा नातेसंबंध अभ्यासपूर्णरीत्या उलगडून दाखविणारे पुस्तक मराठीत हवेच होते. आपण हे काम केलेत, अतिशय आस्थेने केलेत. मनस्वीपणे केलेत. म्हणूनच आपले हे पुस्तक अत्यंत वाचनीय तर झाले आहेच पण वाचकांच्या चित्रपट विषयक जाणीव विस्तारणारे झाले आहे.

---अशोक राणे (श्रेष्ठ चित्रपट समीक्षक)
लिखित शब्दांतून चित्रपट वाचकांच्या डोळ्या समोर जिवंत करण्याचे पाडळकरांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे....चित्रपटातील पात्रांबरोबर आपणही आपले सुख शोधू लागतो, दु:ख समजून घेतो. पुस्तक वाचल्यावर पुन्हा हे चित्रपट पाहण्याची उर्मी मनात दाटून येते हे निश्चित.

---प्रसाद मणेरीकर (सकाळ-विदर्भ आवृत्ती-२१-४-२००४)

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क