मुलांसाठी पथेर पांचालीसत्यजित राय यांचा ‘पथेर पांचाली’ हा भारतीय सिनेमाला जगाच्या पाठींवर स्थान मिळवून देणारा महान चित्रपट. हा चित्रपट विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. ही कादंबरी बंगालीतील एक श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. रवींद्रनाथ टागोरांनी तिच्याबद्दल लिहिले, ‘या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही. पण हे पुस्तक वाचून मी अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पाहिल्या.’
या दीर्घ कादंबरीची मुलांसाठी छोटी आवृत्ती खुद्द लेखकानेच तयार केली. तिचे नाव त्यांनी ठेवले, ‘आंब्याच्या कोयीची पुंगी.’ तिच्या एका आवृत्तीसाठी मुखपृष्ठ व चित्रे काढण्याचे काम सत्यजित राय यांच्याकडे आले. ती चित्रे अतिशय लोकप्रिय बनली. पुढे ‘पथेर पांचाली’ चित्रपट तयार करताना राय यांना त्या चित्रांचा फार फायदा झाला. या कादंबरीचा खास महाराष्ट्रीय मुलांसाठी केलेला हा अनुवाद. राय यांच्या चित्रांसह. मराठीत हा मूल्यवान ऐवज प्रथमच आला आहे.
|
गोजी, मुग्धा आणि करोनागोजी : ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी.
तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण – मुग्धा. ‘करोना’च्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ – दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन् मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का? कोण होती मुग्धा? कुठे होते तिचे जग? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ओढून नेणारी रहस्यकादंबरी
|
यक्षभूमीचा जादूगारएल. फ्रांक. बाउम या अमेरिकन लेखकाने १२० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘The Wonderful Wizard of Oz’ या अत्यंत लोकप्रिय कुमार कादंबरीचा भारतीय भूमीतील अवतार. आजवर या कादंबरीच्या पन्नास लाखाहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. मराठी बाल वाचकांसाठी व पालकांसाठी ही एका अद्भुत जगाची सफर. जी संपली तरी संपूच नये असे तुम्हाला वाटत राहील.
|
यक्षभूमीची नवलकथा‘The Wonderful Wizard of Oz’ या जगप्रसिद्ध कादंबरीचा लेखक एल. फ्रांक. बाउम याने एक शतकापूर्वी ‘Oz’ ही भूमी केंद्रस्थानी ठेऊन १४ कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी पहिल्या कादंबरीचा अनुवाद आपण ‘यक्ष भूमीचा जादुगार’ या नावाने वाचला आहेच. बाउम याच्याच ‘The Marvelous Land of Oz’ या अत्यंत लोकप्रिय कुमार कादंबरीचा भारतीय वेशातील अवतार ‘यक्षभूमीची नवलकथा’ या नावाने आम्ही सादर करीत आहो. मराठी बाल वाचकांसाठी व पालकांसाठी ही एका अद्भुत जगाची सफर. जी संपली तरी संपूच नये असे तुम्हाला वाटत राहील.
|
गाण्याचे कडवे
एका लहान मुलीच्या जीवनातील तीन वर्षांची ही कहाणी.हे तिचे उमलण्याचे दिवस. ह्याच दिवसांत तिची भेट ऊन-पावसाशी होते, चंद्र सूर्यांशी होते, फुलांशी होते, रंगांशी होते. नवी नाती जुळत जातात. मनाचे आकाश फैलावत जाते. प्रत्येक दिवशी एक नवा तारा या आकाशात उगवतो. नवे रस्ते भेटतात. नवी माणसे भेतातात. वाहता वाहता विस्तारत जाणाऱ्या नदीच्या पात्रासारखे तिचे आयुष्य पुढे सरकत जाते.
तिच्या मनावर पडलेल्या जगाच्या प्रतिबिंबांची ही कहाणी. तिच्याच शब्दांत. जीवनातील सौंदर्य व अर्थ शोधीत तिला अजून पुढे जायचे आहे. .... महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९९७-९८
|