अर्पणपत्रिका :
नंदाताई पैठणकर या ‘खऱ्या’ मुग्धाच्या आईस..

‘गाण्याचे कडवे’ नंतरची अनेक वर्षांनी आलेली विजय पाडळकरांची नवी कुमार कादंबरी.
एका मुलाखतीत पाडळकरानी या कादंबरी बद्दल आपली भूमिका सविस्तर मंडळी आहे. ते म्हणतात,
‘गोजी नावाच्या, हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या, हुशार आणि तल्लख कल्पनाशक्ती असलेल्या मुलीच्या आयुष्यातील एक ‘नवल-पर्व’. गेल्या एक वर्षापासून करोनाच्या भयप्रद सावलीत आपण वावरत आहो. मोठी माणसे तर भयचकित झालेली आहेतच पण मुलांच्याही मनावर त्या अदृष्टाची सावली पडलेली आहे. या कादंबरीची नायिका गोजी, आजूबाजूची माणसे करोना संकटाकडे कशी पाहतात याचे देखील निरीक्षण करीत आहे. ती बुद्धिमान आहे. तिच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते आहे. मोठ्या माणसांना यातून काही मार्ग सापडत नाही हे तिला दिसते आहे. अशावेळी तिला तिच्या मैत्रिणीची-मुग्धाची-आठवण होते.
ही मुग्धा हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. ही पुस्तकांच्या जगातील मुलगी आहे. जी.एंच्या ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या पुस्तकातील मुग्धा ती हीच. हे पुस्तक गोजीच्या फार आवडीचे आहे. तिने त्या पुस्तकाची पारायणे केली आहेत. एकदा माझ्या मनात एक कल्पना चमकली. ही मुग्धा गोजीला भेटली तर कसे होईल? मी त्यांची ‘भेट घडवून’ आणली.
या भेटीत मुग्धा गोजीला म्हणाली, ‘मी ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या पुस्तकातील मुग्धाच आहे.’ गोजी म्हणाली, ‘पुस्तकातील माणसे खरी असतात काय?’
मुग्धा म्हणाली, ‘असतात, पण ज्यांचे पुस्तकावर प्रेम असते त्यांनाच ती दिसतात.’
आजच्या भाषेत ही माझ्या नव्या पुस्तकाची tag-line आहे. ‘पुस्तकावर प्रेम असेल तर त्यातील माणसे तुम्हाला नक्की भेटतात.’ प्रत्यक्षातल्या मुलीला जर पुस्तकातील मुलगी भेटली तर काय होईल या ‘काल्पनिकेभोवती’ मी या पुस्तकाची रचना केली आहे.’

“‘काल्पनिका’ हे स्वप्नरंजन नाही का?” या प्रश्नाला उत्तर देताना पाडळकर म्हणाले,
“आहेच. मात्र मुलांनी या वयात स्वप्ने पाहिलीच पाहिजेत. आता जर ती स्वप्ने पाहणार नाहीत तर कधीच पाहणार नाहीत. प्रत्यक्षात पूर्ण केलेले कोणतेही विलक्षण कृत्य पहिल्या टप्प्यावर स्वप्नच असते. दुसरे म्हणजे आजची पिढी आपल्या मानाने खूपच चौकस आहे. संगणक, मोबाईल आदि गोष्टीमुळे त्यांच्या माहितीच्या परिघात प्रचंड वाढ झाली आहे तसेच त्यांची कल्पनाशक्तीही विस्तारली आहे. स्वप्ने मुलेच पाहतात असे नव्हे. श्रेष्ठ शास्त्रज्ञ देखील स्वप्ने ‘पाहत’ असतात. कलेच्या माध्यमातून सत्य शोधायचे असेल तर ‘कल्पना’ आवश्यकच आहे. टागोर म्हणतात, ‘वास्तवाचा पोशाख किती घट्ट होतो सत्याला/ कल्पनेच्या पायघोळ झग्यात ते मुक्त बागडते..’
‘गोजी-मुग्धा आणि करोना’ हा मुलांच्या वास्तव जगाला कल्पनेतील जगाशी जोडण्याचा अभिनव प्रयत्न आहे.

करोनामुळे ज्या काही मोजक्या चांगल्या घटना घडल्या त्यापैकी एक ‘गोजी, मुग्धा आणि करोना’ चे आगमन.
---एक सुजाण प्रतिक्रिया
मुळात कल्पना खूपच चांगली, म्हणजे ‘ओरीजीनल’. त्यामुळे कथावस्तू अत्यंत औत्सुक्यपूर्ण झाली आहे. पुस्तकातून [ज्ञान- शहाणपण-विस्डम] बाहेर येणारी मुलगी [खर तर ही गोजीच आहे, म्हणजे तिचे दुसरे रूप] आणि प्रत्यक्षातील मुलगी यांचा मेळ इंटरेस्टिंग आहे.
---श्रेष्ठ कथाकार भारत सासणे