Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

तो उंच माणूस

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...

प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस

प्रथमावृत्ती: मे २०२२

किंमत: ७००/ रु.

पृष्ठे: ५२०
अर्पणपत्रिका :
विभूतिभूषण बंद्योपाध्याय
या पवित्र आत्म्यास
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक एकदा माधवी मुखर्जीला म्हणाले होते’
“ऐक मधू, आपल्या देशातील सारे चित्रपट दिग्दर्शक एक तर अर्धवट आहेत किंवा मूर्ख आहेत. ज्याला सिनेमाची कला अवगत आहे असा येथे एकच माणूस आहे-‘तो उंच माणूस’”

सत्यजित राय यांच्याविषयी हे उद्गार काढताना घटक यांच्या मनात राय यांची सहा फूट चार इंचाहून अधिक उंचीच फक्त नव्हती! त्यांचे हिमालयाएवढे कर्तृत्त्व देखील होते.

सत्यजित राय यांच्याविषयीच्या अशा दुर्मिळ आठवणींनी सजलेला हा ग्रंथ त्यांच्या जीवनाचा दीर्घ आढावा तर घेणारा आहेच पण त्यांच्या साऱ्या चित्रपटांच्या निर्मितीचा इतिहास सांगणारा देखील आहे. श्रेष्ठ चित्रपट समीक्षक रॉजर इबर्त लिहितो, ‘Never before had one man such decisive impact on the films of his culture.’ राय यांनी भारतीय सिनेमाचा चेहरा मोहराच कसा बदलून टाकला याचे दर्शनही या ग्रंथातून घडते. श्याम बेनेगल म्हणतात की ‘भारतीय सिनेमाबद्दल बोलताना सत्यजित राय पूर्वीचा सिनेमा आणि राय नंतरचा सिनेमा असेच वर्गीकरण करावे लागते.’

या ग्रंथात पाडळकरांनी  सत्यजित राय यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्मिती व तिचे भारतीय समाज जीवणावर झालेले परिणाम तर शोधले आहेतच शिवाय त्या निर्मितीमागे राय यांच्या कोणत्या प्रेरणा होत्या, जीवनविषयक व कला विषयक कोणते दृष्टीकोन होते, आपले कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी आपल्या क्षमतांचा कसा अथक पाठपुरावा केला, एक व्यक्ती म्हणून त्यांची स्वप्ने, त्यांनी जोपासलेली मूल्ये, त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा  कोणत्या होत्या यांचाही  वेध घेतला गेला आहे.

सत्यजित आणि सौमित्र चटर्जी यांचे गुरु-शिष्याचे नाते होते. राय यांच्या निधनानंतर सौमित्र त्यांच्या पार्थिवाशेजारी मान खाली घालून बसला होता त्यावेळी त्याची एक मैत्रीण त्याला म्हणाली,
“रडू नकोस, राय तुला एक समृद्ध वारसा देउन गेले आहेत.”

​राय आपणा सर्वासाठी एक समृद्ध वारसा सोडून गेले आहेत. तो जतन करणे व इतरांपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून लिहिलेले हे महा-चरित्र.
‘आणखी किती दूर तू मला नेणार आहेस?
कुठल्या किनार्याला तुझी ही सोन्याची नाव थांबणार आहे?
मी तुला विचारतो आणि तू फक्त तुझे ते मृदू हास्य करतोस
नि:शब्दपणे तू तुझे बोट उचलतोस आणि
किनारा नसलेल्या समुद्राकडे निर्देश करतोस.
काय आहे त्या दिशेला?
​काय आहे जे मी शोधायला निघालो आहे?
हेही पहा : सत्यजित राय यांचे जीवन व कार्य यांचे दर्शन घडविणारी भारतातील एकमेव वेब-सिरीज

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
vvpadalkar@gmail.com
+९१-९८६७५९८८३६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क