Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

गर्द रानात भर दुपारी

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...
Picture

प्रकाशक : यक्ष प्रकाशन

प्रथमावृत्ती: २००७

किंमत: १२०/-

पृष्ठे: १२०
अर्पणपत्रिका: कंधार येथील नगरेश्वर टॉकीजला-
हलत्या सावल्यांची जादू जेथे प्रथम पडद्यावरून मनात शिरली.

‘राशोमोन’ हा श्रेष्ठ जपानी सिने-दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याचा अभिजात चित्रपट. प्रत्येक चित्रपट समीक्षकाची व रसिकाची आपली अशी महान चित्रपटांची यादी असते. जगातील सर्वोत्तम चित्रपटांच्या प्रत्येक अशा यादीत सहसा ‘राशोमोन’ चे नाव असतेच. जगभरातील फिल्म इन्स्टिट्यूटस मध्ये हा चित्रपट अभ्यासाला जातो. हा चित्रपट जपानी कथाकार अकुतागावा याच्या दोन लघु कथांना एकत्रित करून कुरोसावाने तयार केला आहे. पाडळकरांनी या दोन लघुकथांचा अनुवाद मराठी वाचकांसाठी सादर केला आणि या कथांना चित्ररूप देतांना कुरोसावाने जी विलक्षण कामगिरी केली याचे तपशीलवार विश्लेषण केले आहे.

राशोमोन’ हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिल्यावर, त्यासंबंधी वाचल्यावर, चर्चा केल्यावरही तो पूर्णपणे समजला आहे असे म्हणता येत नाही. पण त्यासंबंधी काही मते फक्त मांडता येतात, आपल्याला झालेले आकलन हे असे आहे एवढेच सांगता येते. आपल्याला काही समजले आहे तसेच अजून बरेच काही अंधारात आहे हेही कळते. जे समजले नाही त्याचा शोध सुरू ठेवावा लागतो. आंद्रे गीद म्हणतो, ‘पूर्ण सत्य कोणाला कधी समजले आहे? जे सत्याचा शोध घेत आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा पण सत्य समजले आहे असे म्हणणाऱ्याचा संशय घ्या.’

रॉजर इबर्त हा समीक्षक या चित्रपटाविषयी लिहितो, ‘’राशोमोन’ चा संदेश असा आहे की आपण जे पाहतो त्याबद्दलही साशंक असावे. कारण आपण जे पाहतो आहो असे आपल्याला वाटते तेच आपण पाहतो.’

‘गर्द रानात भर दुपारी’ हे पुस्तक ११-२-२००७ रोजी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते नांदेड येथे प्रकाशित झाले. याप्रसंगी श्री. गुलजार म्हणाले, ‘पाडळकर करीत असलेला साहित्य आणि सिनेमा या दोन कलांचा अभ्यास अत्यंत मोलाचा असून तो या पद्धतीने भारतात यापूर्वी कोणीही केलेला मला ठाऊक नाही’
‘राशोमोन’ या श्रेष्ठ चित्रकृती संबंधी ‘गर्द रानात भर दुपारी’ या पुस्तकात  एकत्र माहिती उपलब्ध तर होतेच पण एका संवेदनशील व रसिल्या मनाला भावलेल्या त्या कृतीचे विश्लेषणही आढळते. चित्रपटाच्या कथेच्या मूळ लेखनापासून दिग्दर्शकाच्या प्रतिभाधर्माचा, तिचा रसिकांवर होणाऱ्या परिणामाचा, तिच्या संबंधीच्या मत-मतांतरांचा सूक्ष्म आलेख विजय पाडळकर काढतात.
एका चित्रपटाचा विजय पाडळकर यांनी घेतलेला शोध व त्याचे विविध अंगांनी केलेले विश्लेषण त्यांच्या समृद्ध अभिरुचीचा परिचय करून देते.


---‘ललित’-लक्षवेधी पुस्तके (एप्रिल २००७)
चित्रपट अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करावा इतके हे पुस्तक परिपूर्ण झाले आहे.

---‘मिळून साऱ्याजणी’ (जानेवारी २००९)
हे पुस्तक वाचल्यावर दुर्बोध ‘राशोमोन’ सामन्याला सुबोध असल्याचा प्रत्यय येईल.

---‘अनुभव’ (सप्टेंबर २००७)
एका श्रेष्ठ चित्रपट निर्मितीचा शोध : गर्द रानात भर दुपारी.

---डॉ. तडकोडकर - गोमंतक (१७-२-२००८)
पाडळकर यांनी या पुस्तकात जपानी चित्रपट सृष्टी, कुरोसावा यांचे जीवन व कारकीर्द, लघुकथाकार अकुतागावा यांचा परिचय, त्यांच्या दोन्ही कथांचे अनुवाद व मुख्य म्हणजे चित्रपटाची संपूर्ण अनुवादित पटकथा दिली असल्याने हे पुस्तक एक महत्वाचा दस्तऐवज ठरते. एका चित्रपटावर स्वतंत्र असे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. 

---अभिजित देशपांडे- ‘वाचायलाच हवे’ लोकसत्ता

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क