प्रकाशक : संगत प्रकाशन
प्रथमावृत्ती: १९९४
|
किंमत : ८५/-
पृष्ठे: १४४
|
अर्पणपत्रिका:
प्रिय सौ. प्रतिभा व मदन यांस...
तुमच्यामुळे मला जगण्याचे बळ मिळते.
प्रिय सौ. प्रतिभा व मदन यांस...
तुमच्यामुळे मला जगण्याचे बळ मिळते.
१९९० साली विजय पाडळकर यांनी ‘देशोदेशीच्या कथा’ या विषयावर ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये एक लेखमाला लिहिली. त्या सुमारासच मराठी कथेची शताब्दी साजरी होत होती हे एक कारण ही लेखमाला लिहिण्यामागे होते. जगभरातील लघुकथांचा अभ्यास करीत असतांना पाडळकर यांना ज्या अप्रतीम कथा भेटल्या, त्या कथा व त्यांचे कथाकार यांच्यावर आस्वादक समीक्षेच्या पद्धतीने लिहिलेले लेख वाचकांना अतिशय आवडले.
कथा ही आकाराने लहान असल्यामुळे ती जीवनाच्या विविध पैलूंना आपल्या आवाक्यात आणू शकत नाही असा एक मुद्दा कथेला दुय्यम दर्जाचा साहित्यप्रकार मानणाऱ्या समीक्षकांकडून मांडला जातो. पण उत्तम कथा ही एखाद्या रत्ना सारखी असते. आकार मानावरून तिची किंमत ठरविणे योग्य नव्हे. कथेचे महत्त्व आहे ते तिच्या उत्कटतेत, वाचकाला झपाटून टाकण्याच्या तिच्या आंतरिक शक्तीत. चेकोव्ह ची एक लहानशी कथा थेट आयुष्याच्या गाभ्याला जाऊन भिडते.
कथा ही घटनेच्या गाभ्यातून वर येते, जमिनीतून वर येणाऱ्या झऱ्यासारखी ती शुद्ध असते. तिच्यात फारसे हीन मिसळलेले असत नाही. ओ’कोनर म्हणतो की कथा Pure story telling तर कादंबरी म्हणजे applied story telling होय.

लघुकथा या साहित्य प्रकारचा अभ्यास करताना पाडळकर यांनी कथा व कादंबरी यांच्या संदर्भात पुढील मोलाचे विधान केले आहे-
‘कादंबरीची तुलना मी एका बलवान अशा किल्ल्याशी करीन. किल्ला-जो स्वयंपूर्ण आहे, ज्याच्याभोवती भक्कम तटबंदी आहे, ज्याच्या आत एक संपूर्ण विश्व नांदते आहे, व ज्याची सूत्रे एका विशिष्ट ठिकाणाहून हलविली जातात. किल्ल्यात अनेक व्यक्ती राहत असल्या तरी त्यांचे किल्ला या वास्तूशी अतूट नाते असते. कादंबरीचे असेच आहे. तिचे विश्व स्वायत्त आहे, तिच्यात अनेक घटकांना नियंत्रित करणारे मुख्य आशयसूत्र असते, किल्ल्याप्रमाणे तिचे रूप गूढ व गुंतागुंतीचे असते. तिच्यातही अनेक भुयारे असतात, गूढ वाटा असतात, आणि जीवनोत्साहाच्या पाण्याचे खळखळते झरे असणारी सरोवरेही तिच्यात असतात.
याउलट एका कथाकाराचे विश्व हे एखाद्या आधुनिक कॉलनीसारखे असते. आधुनिक नगरात वेगवेगळ्या वस्त्या, घरे असावीत तशा त्याच्या कथा असतात. प्रत्येक घराला स्वतंत्र अस्तित्त्व असते, आकार असतो, त्याचे आपले स्वतंत्र विश्व असते. असे असले तरी प्रत्येकावर त्या नगररचनाकाराची अमिट व स्पष्ट मुद्रा असते. ‘चेकोव्ह टाऊन’, ‘हेमिंग्वे सिटी’ किंवा ‘जीए नगर’ नजरेसमोर आणल्यास हे रूपक अधिक स्पष्ट होईल. प्रत्येक मोठा कथाकार हा आपले स्वतंत्र नगर वसवीत असतो. म्हणून कथाकाराचे मोठेपण जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या साऱ्या कथांचा अभ्यास करणेच आवश्यक व त्याला न्याय देणारे असते.’

पाडळकर यांची रसिकता अप्रतिहत आणि शोधाकता चोखंदळ असल्यामुळे भिन्न दिशांचे वेध घेण्यात त्यांच्या साहित्य-दृष्टीला सार्थकता वाटते. परिणामी देशी, वेदेशी, बाल, प्रौढ, तरल, शोकात्म, सनातन व नूतन असे विविध पैलू असलेली कथापुष्पे आपल्या मनात उमलतात तेव्हा आपल्या आत एक नवी पहाट होत असते. नव्या दिशा उजळत असतात.
समीक्षेच्या सहवासाने आपल्याला साहित्य अधिक मार्मिकपणे समजावे व साहित्याच्या संस्कारांतून जीवनातील अर्थगर्भतेचे अधिक आकलन व्हावे अशी ज्यांची धारणा असेल त्यांना हे पुस्तक आश्वासक वाटेल.
---माधव कृष्ण