एक आफ्रिकन लोककथा आहे :
एका खेड्यातील एक कथेकरी आपल्या गोष्टीचा शेवट जवळ आला की जमिनीवर बसायचा, वाकून आपले पंजे जमिनीवर ठेवायचा आणि म्हणायचा :
“माझी गोष्ट मी इथे जमिनीवर ठेवली आहे. एखादे दिवशी कुणी येईल व तिला उचलून पुढे चालू लागेल.”
माझ्या कथाही मी या कागदांवर ठेवल्या आहेत.कुणी येईल व त्यांना उचलून पुढे चालू लागेल..
-विजय पाडळकर
एका खेड्यातील एक कथेकरी आपल्या गोष्टीचा शेवट जवळ आला की जमिनीवर बसायचा, वाकून आपले पंजे जमिनीवर ठेवायचा आणि म्हणायचा :
“माझी गोष्ट मी इथे जमिनीवर ठेवली आहे. एखादे दिवशी कुणी येईल व तिला उचलून पुढे चालू लागेल.”
माझ्या कथाही मी या कागदांवर ठेवल्या आहेत.कुणी येईल व त्यांना उचलून पुढे चालू लागेल..
-विजय पाडळकर
‘पाखराची वाट’ या आपल्या पहिल्या कथा संग्रहात पाडळकरांनी रचनेचे विविध प्रयोग केले आहेत. या संग्रहात लघुतम कथा, कथा तर एक दीर्घकथा आहे. मराठवाड्याच्या मातीचा गंध असलेल्या या कथा स्थल-कालाच्या बंधनात न राहता विश्वात्मक होतात त्या पाडळकर यांच्या संयमी हाताळणी मुळे आणि घटनांच्या पलीकडे पाहण्याची नजर असल्यामुळे.
या कथासंग्रहात पाडळकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या १५ लघुतम कथा, दहा कथा आणि एक दीर्घकथा एकत्रित करण्यात आल्या आहेत.
या कथासंग्रहात पाडळकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या १५ लघुतम कथा, दहा कथा आणि एक दीर्घकथा एकत्रित करण्यात आल्या आहेत.
You are a natural storyteller. I admire the way you write and narrate punches of life in a story.
---गुलजार
[या कथांमधील] भावानुभव हृद्य आणि संपन्न आहे. संवाद माध्यमाचे लक्षणीय उपयोजन, भाषेचा साज लेवून नव्हे तर भावाचा फुलोरा घेऊन येणारी सहज शैली, आंतरमनाचे निखळ दर्शन यामुळे हे कथा प्रसंग सजीव झाले आहेत. लेखकाने शोधलेली कथावाट हा वाचकांसाठी आनंद विसावा आहे. भावगर्भ अनुभवाचा आणि अस्सल अदाकारीचा.
---‘ललित’ लक्षवेधी पुस्तके जुलै २००३
तुम्ही स्वत: उत्तम कथाकार आहात आणि कथा या साहित्यप्रकाराची तुम्हाला फार चांगली जाण आहे. ‘लघुतम कथा’ या वाड़मयप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याची मोलाची कामगिरी तुम्ही केली आहे.
---डॉ. सुधीर रसाळ
कथेविषयीचे पाडळकरांचे प्रेम हे सर्वांगीण आणि डोळस आहे. कथेचा रूपाकार, तिची केंद्रवर्ती सूत्रे, तिचा आशय, तिचा उद्देश आणि तिचा परिणाम या सर्वांविषयी त्यांना निश्चितपणे काही सांगावयाचे असते. पाडळकर हे कथामहात्म्याचे दार्शनिक आहेत.
--- श्री.त्र्यं.वि. सरदेशमुख
पाडळकरांची तरल संवेदनशीलता, मानवी भावनांच्या रूपातील काव्यात्मता नेमकेपणी टिपणारी शब्दसंपदा, वाचकाच्या कल्पनाशक्तीला विस्तीर्ण अवकाश उपलब्ध करून देणारे रूपकतत्त्वीय, गतिमान असे कथेच्या शेवटचे पूर्णविराम,यामुळे कथात्म घटीताच्या मुळाशी असणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म तरल, मानवी भाव स्पंदनांच्या इंद्रधनुष्याचे रंग, त्यांचे आकार शोधण्याच्या प्रयत्नातील विकासाची पाउलवाट म्हणून या कथा मराठी कथेचे लक्षणीय अलंकार ठराव्यात.
--- डॉ. प्रकाश मेदककर
स्वतंत्र वाट शोधणाऱ्या कथा
--- डॉ. रवींद्र ठाकूर . सकाळ-कोल्हापूर २-५-२००४
मन:चक्षूच्या कटाक्षापलीकडील शब्दांचे महदाकाश
--- डॉ. हिवरेकर. सत्यप्रभा ७-९-२००३
पाखराची वाट’ वाचताना जाणवत राहतो तो एक निरंतर आत्मशोध, कधीही न संपणारा. या वाटचाली तला नेमका दुवा म्हणजे प्रत्येक वाचकाला या कथेत कोठे ना कोठे स्वत:ची भेट होत जाते. ही विश्वात्मकता कथांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. ही कथांची आरास मधमाशांच्या पोळ्यासारखी आहे. ‘गोळा करणे आणि मांडणी करणे’ यापैकी एकाही गोष्टीत मधमाशा कमी पडल्या की मधाचे पोळे माशांच्या आवाक्यातून निसटायला लागते. आपले अनुभव असे निसटणार नाहीत याचे भान असलेला हा विरळा कथालेखक आहे.
--- मनोज बोरगावकर
मला सर्वाधिक आवडली ती तुमची ‘आर्त’ ही कथा. त्रोटक आकारमान, विषय, तो हाताळण्याची रीत आणि तिची ‘crescendo’ सारखी अखेर यामुळे ती नुसतीच आगळी वेगळी नव्हे तर वाचन संपताच नकळत कर जुळावेत इतकी प्रभावी झाली आहे. अंतरातली आयुष्यभराची घालमेल क्षणात संपविणाऱ्या एका प्रत्ययकारी अनुभूतीचा तो विलक्षण आलेख आहे. असे काही घडते ते अवधानासारखे निमिषातच, म्हणून त्याची कथाही तेवढीच त्रोटक असणे साहजिक आहे.
तुमच्या कथेतला ‘तो’ रूढ अर्थाने आस्तिक नाही. तीर्थक्षेत्रे, देव देवळे यांत त्याला मुळीही रुची नाही. त्यांनी दु:ख दूर होत नाही ही समज असण्याइतका तो सुजाण आहे. त्याला आत्मकेंद्री दु:खापासून सुटका करून घेण्याची ओढही आहे पण, ती कशी व्हावी हे मात्र कळत नाही. अशा तडफडीत त्याला एका आर्त संध्याकाळी देवळाबाहेरच्या विराट निसर्गात ‘देवदर्शन’ होते आणि क्षणात तो ब्रह्मांडरूप होतो. या विस्तारातून त्याची अहंकेंद्री व्यथा संपते आणि नकळत तो ‘नरहरी, शामराजा, कृपा करा’ असे म्हणून शरणागत होतो. ही ‘मी’ चा ‘स्वामी’ होण्याची कथा आहे. अशा परिवर्तनाला कुठलातरी धक्का, आघात, वा साक्षात्कार लागतो. असला आघात फक्त शेलक्यांच्याच वाट्याला येतो. असा एक भाग्यवान तुमच्या कथेत अवतरलाय. वाटते तो तुम्हीच तर नव्हे? असाल तर बरे, कारण मला तुमचा हेवा करायचाय!’
--- मनोहर सप्रे