अर्पणपत्रिका :
‘संगीत मन को पंख लगाये’ हे लिहिणारा शैलेंद्र
आणि
त्याच्यावर प्रेम करणारे मित्रवर्य प्रकाश संत यांना..
‘संगीत मन को पंख लगाये’ हे लिहिणारा शैलेंद्र
आणि
त्याच्यावर प्रेम करणारे मित्रवर्य प्रकाश संत यांना..
We live to taste life twice, in the moment and in retrospection - Anais Nin
अभिजात साहित्य आणि चित्रपट यांच्या इतकेच विजय पाडळकरांचे हिंदी सिने संगीतावर प्रेम आहे. ‘मनावर शब्दांची भूल पडण्याआधीच स्वरांची भूल पडली होती’ असे त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे. गाणी ऐकण्याच्या छंदातून ते गाणी जमविण्याच्या छंदाकडे वळले. दहा हजाराहून अधिक हिंदी सिने गीतांचा त्यांचा संग्रह आहे. हा छंद जोपासतांना त्यांच्या ध्यानात आले की हिंदी चित्रपटातील गीतकार हा अतिशय दुर्लक्षित घटक आहे. गाण्यांच्या रसिकाला विचारले तर तो त्याच्या आवडीची वीस गाणी चटकन सांगेल. या गाण्यांचे गायक/गायिका, संगीतकार त्याला माहीत असतील. परंतू त्यापैकी दहा तरी गीतांचे कवी त्याला सांगता येणार नाहीत. ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ सारखे अप्रतीम गीत लिहिणाऱ्या पी.एल.संतोषी बद्दल आज कोणाला माहिती आहे? ‘महल’चे ‘आयेगा, आनेवाला’ हे गीत साऱ्यांना ठाऊक आहे पण ते दोन गीतकारांनी मिळून लिहिले आहे हे कोण जाणतो?
कवी नीरज यांनी लिहिले आहे, ‘उन्ही फकीरों ने लिखा है इतिहास यहां/ जिन पे लिखने के लिये इतिहास को समय न था’. गीतकारांची ही उपेक्षा पाडळकरांना खटकली व त्यांनी त्यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली. वली साहेब, पंडित इंद्र, सरशार सैलानी, कैफ इरफानी, शमीम जयपुरी अशा गीतकारांचे जीवन आणि त्यांच्या रचनांचा शोध घेतला. ‘बखर गीतकारांची’ या ग्रंथात ज्ञात-अज्ञात अशा ८९ गीत कारांबद्दल त्यांनी जाणकारीने व जिव्हाळ्याने लिहिले आहे. १००० हून अधिक अप्रतीम गाण्यांचे संदर्भ असलेला हा मौल्यवान संदर्भ-ग्रंथ आहे.
हा असा ग्रंथ आहे की जो वाचतांना वाचक त्यातील जगात हरवून तर जाईलच पण बाहेर आल्यावर त्याला पुन्हापुन्हा तेथे परतावेसे वाटेल. पाडळकरांच्या लेखनाची सारी गुण वैशिष्ट्ये एकत्र येऊन तयार झालेला हा ग्रंथ एकाचवेळी एक विश्वसनीय इतिहास आहे, एक वाचनीय बखर आहे आणि आजच्या युगातील एका महत्त्वाच्या कलेचा अभ्यासपूर्ण आस्वाद देखील आहे.

पाडळकरांच्या लिखाणाची मांडणी अभ्यासपूर्ण, सटीक, विवेचनात्मक असते, तसेच त्यांच्या खास शैलीने रंगविणारी असते. ते अतिशय चिंतनशील गांभीर्याने आपले मत व्यक्त करतात त्यामुळेच त्यांच्या लिखाणाला वैचारिक खोली असते. या पुस्तकात त्यांनी हिंदी गीतकारांचा आढावा घेताना लता मंगेशकर यांच्या गाण्यात ते ज्या क्रमाने आले तोच क्रम ठेवला आहे. त्यामुळे आपोआपच लता मंगेशकरांच्या गान कारकीर्दीचा आलेख नकळत निर्माण झाला आहे.
पुस्तकातील छायाचित्रे अतिशय दुर्मिळ अशी आहेत. पुस्तक वाचताना गाण्यांच्या दुनियेत वाचक हरवून जातात. मला वाटते पुस्तकाचे यश नेमके हेच आहे.
---धनंजय कुलकर्णी , ‘तारांगण’ मे २०१५