अर्पणपत्रिका : प्रिय गोविंद कुलकर्णी यास
‘डॉन क्विझोटीझम’ या संकल्पनेचा तपशीलवार विचार करणारे मराठीतील एकमेव पुस्तक.
‘डॉन क्विझोटीझम’ म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी, जी भ्रम आणि भ्रमनिरास, श्रद्धा व अश्रद्धा, स्वप्न आणि जागृती यांचे द्वंद्व मान्य करूनही आपल्या आत्म्याची हाक प्रमाण मानते. जीवन हे असंख्य विरोधाभासांनी भरलेले असते. या विसंवादी स्वरांतून आपला एक स्वतंत्र सूर निवडून गात राहणे म्हणजे ‘डॉन क्विझोटीझम’; पदोपदी मानहानी, पराभव पत्करावे लागले तरी आपल्या श्रद्धेचा मार्ग न सोडणे म्हणजे डॉन क्विझोटीझम’; उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणे म्हणजे ‘डॉन क्विझोटीझम’..
श्रेष्ठ कादंबरीकार म्युगुएल डी. सर्वांतीसची महा-कादंबरी ‘डॉन क्विझोट’ ही आद्य आधुनिक कादंबरी मानली जाते. या कादंबरीचा आणि सर्वांतीसच्या शैलीचा प्रभाव जगातील अनेक विचारवंतावर तसेच सृजनशील लेखकांवर पडला आहे. सर्जेई झालीजीन या रशियन टीकाकाराने म्हटले आहे, ‘‘डॉन क्विझोट’ चा अवतार झाल्यावर ‘डॉन क्विझोटीझम’ शिवाय कलाकृती अवतरूच शकत नाही.’ दोस्तोव्हस्कीची कादंबरी ‘द इडीयट’, फ्लोबेरची कादंबरी ‘मादाम बोव्हारी’, बिमल मित्र यांची ‘मुजरीम हाजीर’ आणि जी. ए. कुलकर्णी यांची ‘यात्रिक’ ही कथा यांच्यातील आशयसूत्रांची आणि जीवनदृष्टीची समानता यांचा वेध घेणारे पाच दीर्घ लेख या संग्रहात एकत्रित केलेले आहेत.

समीक्षेची गुंतागुंत टाळून पाडळकर यांची भाषा तर्काचा तोल राखते. त्यामुळे एकाच वेळी काव्यात्मता व वैचारिक गांभीर्य यांचा प्रत्यय देणारे हे ललित लेखन प्रत्यक्षात जरी ग्रंथ विश्वाबद्दल असले तरी परम अर्थाने त्या पलीकडे पसरलेल्या जीवनाबद्दलच असते. ...कलानंदाचे व जीवन जाणिवेचे मोकळे आकाश दाखविणारे हे पुस्तक मराठीतील एक विलक्षण वेगळे व दिलासा देणारे पुस्तक आहे
---माधव कृष्ण
सर्वांतीस या स्पानिश लेखकाचा ‘डॉन’ समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकातील लपलेला डॉन पाहण्यासाठी साहित्य आणि जीवन यांत नजाकतदार सेतू बांधणाऱ्या पाडळकरांचे हे पुस्तक अवश्य वाचावे.
---नंदकुमार रोपळेकर
ज्या वाचकांनी [सर्वांतीस आणि इतर लेखकांचे] हे साहित्य वाचलेले नाही, पण त्यांच्याविषयी माहिती आहे व जाणून घेण्याची इच्छाही मनात आहे अशा वाचकांना पाडळकर यांचा हा संग्रह आपल्यात गुंतवून ठेवतो.जिज्ञासेची पूर्ती करता करताच नवी जिज्ञासा निर्माण करतो. मुळातून वाचण्याची!
हे साहित्यविषयक लेख समीक्षेच्या रूढ वाटेने जात नाहीत तर वाचकांना आपल्या प्रवासात सामील करून घेत एकाच वेळी रसास्वादाच्या आणि तत्त्वचिंतनाच्या अंगाने जातात. हे तत्त्वचिंतनही खरे म्हणजे मानवी मनाचे तलम पापुद्रे सुटे करण्याचा प्रयत्न आहे. कौतुकाच्या भरात वाहवत जाणेही नाही आणि समीक्षेतला कोरडेपणाही नाही.
---रेखा देशपांडे (लोकसत्ता’ २९-८-१९९९)