प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती: १९९५
|
किंमत: १००/-
पृष्ठे: १४४
|
नरहर कुरुंदकर पुरस्कार - १९९५
महाराष्ट्र राज्य पुरस्कार - १९९५
अर्पणपत्रिका:
श्री. त्र्यं. वि. सरदेशमुख व सौ. सुमित्रा सरदेशमुख यांस-
दूरदेशी ज्यांनी मला जवळ केले...
श्री. त्र्यं. वि. सरदेशमुख व सौ. सुमित्रा सरदेशमुख यांस-
दूरदेशी ज्यांनी मला जवळ केले...
साहित्य आणि चित्रपट यांचे नाते मोठे गुंतागुंतीचे आहे. गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रपट यांचा तौलनिक अभ्यास करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे. ‘तीसरी कसम’, ‘आंधी’, ‘भूवन शोम’, गाईड’, ‘डॉ. झिवागो’ आदी आठ चित्रपट, आणि ‘मुजरीम हाजीर’ ही दूरदर्शन मालिका व त्यांच्या मूळ साहित्यकृतींचा हा प्रवास वाचकांना खिळवून ठेवतो. गंभीर चित्रपट समीक्षेची एक वेगळी पायवाट निर्माण करणारे पुस्तक म्हणून ते मान्यता पावले आहे.
चांदण्याचा शीतल आल्हाद देणारे व अभिजात अभिरुचीचे दर्शन घडविणारे हे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित करून रसिकांना एक मोठा ठेवा बहाल केला आहे.
साहित्य व चित्रपट या दोन्ही कलांचा मूलगामी वेध घेणारा हा आस्वाद आहे. कलाकृतीच्या अंत:स्तरापर्यंत वाचकांना नेण्याचे सामर्थ्य या आस्वादात आहे. पाडळकरांसारख्या व्यासंगी रसिकाने लिहिलेल्या सौंदर्यदर्शी आस्वादलेखांना निश्चितच एक प्रगल्भता व सखोलता लाभली आहे. विवेचन तात्विक असूनही रुक्षतेला यांत थारा नाही. लेखकाची सरस, प्रत्ययकारी निवेदनशैली, अनुभव चिंतनातून येणारे जीवन भाष्य लेखांचे सौंदर्य दुणावणारे आहे.
..सर्वांनी मोकळ्या मनाने वाचावेत व मनापासून दाद द्यावी असे हे आस्वादक लेख आहेत.
---प्रा. शुभदा शहा (बेळगाव तरुण भारत)