Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

सिनेमाचे दिवस - पुन्हा

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...

प्रकाशक : मौज प्रकाशन

प्रथमावृत्ती: २००६

किंमत: १५०/-

पृष्ठे: १४४
अर्पणपत्रिका :
लता मंगेशकर यांना
अक्षरांची वाट सापडण्यापूर्वीच तुमच्या स्वरांनी मला
आनंदाच्या डोहापाशी नेऊन सोडले...

‘Whatever you can do or dream you can, begin it. Boldness has genius and power and music in it.’ Goethe
लहानपणा पासून चित्रपटांच्या अनावर ओढीने जेवढे चित्रपट पाहता येतील तेवढे विजय पाडळकर यांनी पाहिले. चित्रपटांविषयी ऐकले, वाचले आणि लिहिले. चित्रपटांचा आस्वादक मागोवा घेणाऱ्या त्यांच्या लेखांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपट विषयक अनुभव व्यापकपणे मिळण्याचा योग पाडळकर यांना अनपेक्षितपणे आला. पुणे येथील ‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या  ‘फिल्म अॅप्रीसिएशन कोर्स’ मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. मनाजोगे लेखन करता यावे म्हणून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मधील नोकरी सोडून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांना ही संधी मिळाली.

१३ मे २००१ ते ९ जून २००१ या काळात या कोर्स मध्ये मिळालेल्या अनुभवांची नोंद पाडळकर यांनी वेळोवेळी आपल्या दैनंदिनीत करून ठेवली. या नोंदींच्या आधाराने आपल्या अनुभवांचे पुनर्लेखन केले. संक्षिप्त नोंदींना पूर्ण रूप मिळाले आणि ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’ हे पुस्तक उभे राहिले.

अनेक कलांत आणि जीवन व्यवहारांत स्वारस्य असलेल्या, विविध धाटणीचे लेखन करणाऱ्या पाडळकर यांचे चित्रपटकलेविषयीचे प्रेम आणि सखोल आकलन येथे प्रत्ययाला येईल.
या पुस्तकाबद्दल बोलतांना विजय पाडळकर म्हणतात -
१ फेब्रुवारी २००१ या दिवशी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती पत्करली.
नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचला उठलो. नेहमीप्रमाणेच फिरायला जाऊन आलो. स्नान करून बैठकीतल्या सोफ्यावर जाऊन बसलो. अगदी निवांत. मनाला प्रश्न केला: कसं वाटतंय? निवृत्ती नंतरची पहिली सकाळ. पण निवृत्त झाल्यासारखे काही वाटत नव्हते. सुटीच्या दिवशी आरामशीरपणे बसलो आहे असे वाटत होते.
मग विचार केला की यापुढचे आयुष्य कसे कंठावयाचे याची रूपरेषा तर तयार करू.
काही काळ पुन्हा स्तब्ध बसलो. अचानक काही शब्दांनी मनात प्रवेश केला. खिडकीतून वाऱ्याची झुळूक घरात यावी तसे ते आले. मनात त्यांची एक रचना तयार झाली. काही शब्द इकडून तिकडे ठेवले. काही बदलले. काही नवे आणले. एक कागद उचलला व भराभर ते शब्द कागदावर उतरवून घेतले.

मी निवृत्त झालोय
आजची पहाट नवे स्वातंत्र्य घेऊन दारात अवतरलीय.
एक रस्ता सोडला, आता सारे रस्ते माझेच आहेत.
इतके दिवस जे केवळ मनात होतं ते सारं आता करायचं
भुईतून नुकत्याच वर आलेल्या रोपासारख जग न्याहाळायचं.
खूप भटकायचं..
एखाद्या ओढ्याशेजारी, आम्र वृक्षाच्या सावलीत
वर संथ सरकणारे ढग पाहत निवांत झोपायचंही.
खूप वाचायचं...
जीव लावणाऱ्या पुस्तकांवर जीव लावून लिहायचं.
एखादं पुस्तक असं लिहायचं की ज्यावर
फक्त आपल्याच आत्म्याची मुद्रा असेल.

गाणी ऐकायची, गुणगुणायची देखील.
एखादा रंगाचा ठिपका अलगद सोडून द्यायचा
कोऱ्या कॅनव्हासवर, आणि भोवती काढायच्या रंगांच्या रेषा, लाटा...
बागेतल्या सुकलेल्या पारिजातकाला
नि मधुमालतीला पाणी घालायचं
आणि मनात अजून दरवळणाऱ्या त्या सुवासाची वाट पाहायची..
लक्ष लक्ष चांदण्यांचा छबिना
पूर्वेकडून पश्चिमेला सरकताना न्याहाळत
आपला एक तारा शोधायचा..
 
आणखी असच काही
खूप...
या वळणावर आपले आशीर्वाद,
आपल्या शुभेच्छा सोबत असाव्यात
तशा त्या असतीलच,
हा विश्वास.
माझे मित्र नयन बाराहाते यांनी या शब्दांना चित्रांचा सुरेख साज चढविला आणि मी अनेक मित्रांना ती भेटकार्डे पाठवून दिली.
पुढे एकदा गुलजार यांच्यासाठी मी या कवितेचा हिंदी अनुवाद केला. त्यावेळी ध्यानात आले की आपण साऱ्या स्वप्नां विषयी लिहिले,पण एका स्वप्नाचा उल्लेख करायचा राहिलाच.
मग ‘गाणी ऐकायची’ या ओळीच्या वर आणखी एक ओळ नव्याने लिहिली-
उत्तमोत्तम चित्रपट पाहायचे-

आता कविता खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. ‘

‘सिनेमाचे दिवस पुन्हा’ हे तुमचे पुस्तक ‘मौज’कडून मिळाले. पुस्तक पाहूनच मन प्रसन्न झाले. अंतर्बाह्य पुस्तक सुरेख झाले आहे. आशयमूल्य आणि निर्मितीमूल्य परस्परांना पोषक झाले आहे.
‘अंतर्नाद’ मध्ये यांतील लेख क्रमश: येत असतानाच उत्सुकतेने वाचले होते. पण पुस्तक रूपात एकत्रितपणे पाहण्याचा, वाचण्याचा परिणाम आणि आनंद वेगळाच, अधिक आनंदाचा असतो. रविमुकुल यांची पुस्तकाची सजावट, मांडणी पुस्तकाचे देखणेपण वाढविणारी आहे.
मराठीतील हे वेगळ्या वळणाचे पुस्तक आहे.


---सु. रा. चुनेकर

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
vvpadalkar@gmail.com
+९१-९८६७५९८८३६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क