Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

देखिला अक्षरांचा मेळावा

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...

प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ

प्रथमावृत्ती: १९८६
चालू आवृत्ती : २००९

किंमत : १२०/-

पृष्ठे: १४४

वाल्मिक पुरस्कार - १९८६

अर्पणपत्रिका :  उठून गेलेल्या जिवलगांसाठी...
  १९८४ साली विजय पाडळकर यांनी ‘मराठवाडा’ दैनिकाच्या रविवार पुरवणीत ‘अक्षर संगत’ हे सदर लिहिण्यास सुरुवात केली. हे पाडळकरांचे पहिलेच आस्वादक ललित लेखन होते. जागतिक साहित्यातील आपण वाचलेल्या श्रेष्ठ ग्रंथांची ओळख मराठी वाचकांना करून द्यावी या उद्दिष्टाने सुरु झालेले हे लेखन पाडळकरांच्या शैलीमुळे आस्वादक समीक्षेचा एक आगळा नमुना बनून गेले.
या लेखनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. पाडळकरांना जाणवले की मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात मोठा वाचकवर्ग पसरला आहे. त्याला वाचनाची आवड आणि भूक आहे, पण काय वाचावे हे त्याला ठाऊक नाही. त्याच्या वाचन प्रवासात आपण त्याला मदत केली पाहिजे. शेवटी श्रेष्ठ कलाकृती या वाचकापर्यंत पोचल्या पाहिजेतच. या सदरामधील ३१ लेखांचे पुस्तक १९८६ साली ‘देखिला अक्षरांचा मेळावा’ या नावाने, ‘स्वयंप्रभा प्रकाशन’ नांदेड यांनी प्रकाशित केले. या पुस्तकाच्या सुरुवातीला पाडळकरांनी ज्ञानेश्वरांची एक ओवी उद्घृत केली आहे-
‘परि तैसे हे नोहेचि देवा
देखिला अक्षरांचा मेळावा
आणि विस्मयाचिया जीवा
विस्मयो जाला’

[७/१८८]
 अक्षरांचा मेळावा पाहून जीवाला झालेला विस्मय या ग्रंथात पाडळकरांनी अतिशय लालित्यपूर्ण पद्धतीने शब्दबद्ध केला आहे.
या पुस्तकाला वाल्मिक पुरस्कार देतांना वामन देशपांडे म्हणाले,
“एका रसिक साक्षेपी वाचकाच्या मनावर पडलेले उत्कृष्ट लेखकांचे आणि त्यांच्या पुस्तकांचे हे पुनवी चांदणे आहे. पाडळकर यांचे हे अभिनव पद्धतीने रेखाटलेले तरुण शैलीदार आत्मचरित्रच आहे. पुस्तकांवर अपरंपार प्रेम केले, लेखकांवर अपरंपार प्रेम केले आणि जोडीला तुळशीवृंदावनापुढल्या पवित्र रांगोळीसारखी शब्दांची रांगोळी काढली तर काय होते असे विचारले तर मी म्हणेन-‘देखिला अक्षरांचा मेळावा’ सारखे चिरंतन आनंद देणारे पुस्तक तयार होते.”

तुमचे पुस्तक म्हणजे ग्रंथांच्या जगातून केलेला एक आल्हाददायक प्रवास आहे. आपल्या वाचनात आणि चिंतनात वाचकांना सामील करून घेण्याचा हा प्रयत्न खूप वेगळा आणि अभिनंदनीय आहे.

--- वि. वा. शिरवाडकर
वाचलेल्या पुस्तकांचा आनंद त्यांतील ऊब तशीच ठेऊन नोंदणे हे फार कठीण काम आहे. पण तुम्ही आपली आनंद हुरहूर आत्मीयतेने मांडली आहे. आपल्या जिव्हाळखुणा अगत्याने व सहजपणे मांडल्या आहेत.

--- जी. ए. कुलकर्णी
पुस्तकातल्या मजकुराचा योग्य तह्रेने उपयोग करीत पुस्तकाची ओळख करून द्यायची व तसे करतानाच ललित लेखनाच्या पद्धतीने स्वत:चा अभिप्राय नोंदवीत जायचा ही तुमची पद्धत मला नवीन आणि आकर्षक वाटली.

--- विश्राम बेडेकर
लेखन किती लहान, पण अर्थवाहित्त्व किती मोठे! सांप्रत तरी मराठीत पाडळकरांच्या लेखनाला तोड नाही.

--- वसंत नरहर फेणे
मराठीत भराभर लिहिलं जातंय; पण साहित्याचे असे सहृदय रसग्रहण क्वचितच वाचायला मिळते.

--- श्री. बा. जोशी.
‘बुधा’ ही सरळ आपल्या मार्गाने गेलेली गीतिका आहे, ते दु:खान्तक नव्हे हे तुम्ही अगदी बरोबर हेरले आहे.  

---गो .नी. दांडेकर

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क