विजय पाडळकर यांनी वेळोवेळी अभिजात चित्रपटांबद्दल दिवाळी अंकातून जे दीर्घ लेखन केले त्यापैकी निवडक सात लेखांचा हा संग्रह आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपटांबरोबरच दोन जागतिक चित्रपटांचा आस्वाद घेणारे हे लेखन. बिमल रॉय यांचा ‘मधुमती’ हा चित्रपट ही एक मनावर फिरणारी एक जादूची छडी आहे असे सांगताना पाडळकर या चित्रपटाच्या साऱ्या अंगांनी मिळून त्याला कसे अविस्मरणीय बनविलेले आहे हे दर्शवून देतात. ‘एक मनोरंजक काल्पनिका तयार करण्याचा संकल्प बिमल रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता आणि तो करता करता ते त्यांत इतके रममाण झाले की खरोखरीच एक जादूचे विश्व तयार झाले. आपल्याला काहीतरी ‘श्रेष्ठ’ निर्माण करायचे आहे असा आविर्भाव कुणाचाही नव्हता.त्यामुळे जे उस्फूर्तपणे जन्माला आले ते एखाद्या रान फुलासारखे होते. टवटवीत, मातीचा गंध आत्मसात केलेले, वाऱ्यावर मनमुक्त डोलणारे...’
पाडळकरांच्या मते ‘प्यासा’ ही एक दीर्घ भावरम्य कविताच आहे. ‘आपण ‘प्यासा’ पाहत असतो म्हणजे अनेक अंगांनी ही कविता अनुभवत असतो.
ही कविता, जी लिहिली गेली साहिरच्या गीतांनी,
सचिन देव बर्मनच्या संगीताने,
गुरुदत्त, वहिदा आणि माला सिन्हाच्या अभिनयाने,
मूर्तींच्या कृष्ण धवल गारुड करणाऱ्या कॅमेऱ्याने..
गुरुदत्त या कलंदर कलावंताने या साऱ्यांना एका माळेत गुंफले..’
या मालेचे सौंदर्य उलगडून दाखविणारा हा लेख.
‘भेट’ या लेखात पाडळकर हे रोहिणी कुलकर्णी यांची ‘भेट’ ही लघु कादंबरी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी तिच्यावरून तयार केलेला चित्रपट यांच्यातील साम्यभेदांची चर्चा करतात तर ‘कैरी’ या लेखात जी.ए.कुलकर्णी यांची ‘कैरी’ ही दीर्घकथा व तिच्यावर आधारित अमोल पालेकर दिग्दर्शित त्याच नावाचा चित्रपट यांच्यातील भिन्न सौंदर्याचा शोध घेतात. चार्ली चाप्लीनचा ‘सिटी लाईट्स’ हा अभिजात चित्रपट बहुतेक सिनेरसिकांना माहित असतो. त्याचे अभिजातपण उलगडून दाखविताना पाडळकर त्या चित्रपटावर बेतलेल्या वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘विदूषक’ या नाटकाचीही चर्चा करतात.
‘देर्सू उझाला’ आणि डी. सिकाचा अमर चित्रपट ‘बायसिकल थीफ’ या दोन चित्रपटांचे पाडळकरांचे रसग्रहणही मुळातून वाचण्यासारखे आहे.

चित्रपट नाट्य, शिल्प वगैरे कलांच्या आस्वादाबाबत आपल्याकडे मुळातच इतकी अनास्था आहे की त्या वाटेवरच्या नवोदित प्रवाशांना पहिली पावले चालायला ‘मोर खुणा’ सारखी पुस्तके मोठीच मदत करतील.
ज्यांनी थिएटरमधल्या अंधारावर आणि त्या अंधारात उमलणाऱ्या स्वप्नांवर प्रेम केलंय त्यांना हे पुस्तक विलक्षण आनंद देईल यात शंका नाही. त्यात जे आपल्याला आवडले तेच इतरांनाही आवडले याबद्दलचा अपर आनंद तर असतोच पण जे आपल्याला आवडले पण नीट शब्दात सांगता येत नाही, ते कुणीतरी अशा तरल मखमली शब्दात मांडल्यावर होणारा नितळ निर्मळ आनंदही सामावलेला असेल.
---‘ललित’ लक्षवेधी पुस्तके ...सेप्टेंबर २०११