अर्पणपत्रिका : रवीन्द्रनाथ टागोर यांना
‘रॉबर्ट फ्रॉस्ट मरण पावला त्याला आता पन्नास वर्षे होऊन गेली. एक माणूस उत्कटपणे आयुष्य जगून निघून गेला. आता तो माणूस म्हणून सामान्य दर्जाचा होता की श्रेष्ठ हा प्रश्न दुय्यम ठरतो. आता त्याचा न्याय निवडा करणारे आपण कोण?
Empedocles हा विचारवंत लिहितो,
Empedocles हा विचारवंत लिहितो,
Having seen a small part of life, swift to die
Men rise and fly away like smoke, persuaded only of what each has met with…
Who then claims to find the truth?’
मात्र लेखकाच्या चरित्राचा अभ्यास केल्यामुळे कलावंत आणि त्याची निर्मिती यांच्या परस्पर संबंधावर काही प्रकाश पडू शकतो म्हणून हा खटाटोप. हा ग्रंथ वाचून वाचकाला रॉबर्ट फ्रॉस्ट समजेल असाही माझा दावा नाही. ब्रोडस्की या श्रेष्ठ रशियन कवीने लिहिले आहे, ‘Would you like to meet Mr. Frost? Then read his poems, nothing else.’
या पुस्तकाच्या वाचनानंतर मराठी वाचक फ्रॉस्टच्या कवितेकडे वळले तर मला आनंद होईल.
तीन भागातील या चरित्रातील पहिल्या भागात रॉबर्ट फ्रॉस्टच्या जन्मापासून ते आपल्या देशात आपली कदर होत नाही हे लक्ष्यात आल्यावर तो इंग्लंडला जातो तिथपर्यंतची कहाणी येते. दुसऱ्या भागात त्याचे इंग्लंड मधील वास्तव्य आणि त्याच्या कवितांना लाभलेली प्रसिद्धी यांचे तर तिसर्यां भागात त्याच्या कवितेचा सर्वांगीण विकास व त्याच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचे वर्णन येते.
कवीच्या जीवनातील घडामोडींचे कथन करताना लेखकाने त्याच्या सुमारे पन्नास श्रेष्ठ कवितांची जी रसग्रहणे केली आहेत ती मुळापासून वाचण्यासारखी आहेत.
रॉबर्ट फ्रॉस्टच्या मृत्युनंतर राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी त्याला श्रद्धांजली वाहताना म्हटले,

जेव्हा शक्ती माणसाला मग्रूर बनविते तेव्हा कविता त्याला त्याच्या मर्यादा समजावून सांगते. जेव्हा शक्ती त्याचे क्षेत्र आकुंचित करते तेव्हा कविता त्याला अस्तित्त्वाच्या विशाल श्रीमंत जगाचे दर्शन घडविते, जेव्हा शक्ती त्याला भ्रष्ट करते तेव्हा कविता त्याचा आत्मा स्वच्छ करते.
महान कलाकार हा नेहमी एकाकी असतो. रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटल्याप्रमाणे त्याचे या जगाशी ‘प्रेमाचे भांडण’ असते...जर कलेने आपल्या संस्कृतीचा मुळांचे पोषण करायचे असेल तर समाजाने कलावंताला, त्याची दिव्य दृष्टी जिकडे नेईल तिकडे मुक्त संचार करू दिला पाहिजे. ‘रॉबर्ट फ्रॉस्टचे जीवन आणि कविता यांमुळे आपली जीवनावरची पकड आणखीनच घट्ट झाली आहे.