अर्पणपत्रिका : प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी
आधुनिक कथा ही कथा, कविता आणि ललित लेखन यांचे संयुग बनले आहे. माझ्या कथांतून लहानशा अवकाशात रचनेचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
--- विजय पाडळकर
‘सुमारे १५ वर्षांपूर्वी विजय पाडळकर यांचा ‘पाखराची वाट’ हा कथा संग्रह प्रकाशित झाला होता. या संग्रहाच्या सुरुवातीला त्यांनी एक आफ्रिकन लोककथा उद्घृत केली होती:
‘एका खेड्यातील एक कथेकरी आपल्या गोष्टीचा शेवट जवळ आला की जमिनीवर बसायचा. वाकून आपले पंजे जमिनीवर ठेवायचा व म्हणायचा,”माझी गोष्ट मी इथे ठेवली आहे. एके दिवशी कुणी येईल व तिला उचलून पुढे चालू लागेल.”
ही गोष्ट सांगून पाडळकरांनी लिहिले होते, ‘ माझ्या कथाही मी या कागदावर ठेवल्या आहेत. कुणी येईल व त्यांना उचलून चालू लागेल.’
२०१७ च्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ची गोष्ट. भल्या पाहटे लेखकाच्या मोबाईलमध्ये बर्लिन हून एक मेसेज आला. ‘व्हॉटस अप’ च्या प्रथेप्रमाणे तो कुठून तरी फॉरवर्ड झाला होता. तो मेसेज असा होता-
‘नुकतच मी ‘पाखराची वाट’ वाचलं. छोट्या छोट्या कथा आहेत त्यात. एक फार सुंदर कथा आहे. –‘
पुढे त्याने ती कथा थोडक्यात सांगितली होती व शेवटी लिहिले होते-
‘याहून सुंदर ‘व्हॅलेंटाईन डे’ची कथा असू शकेल काय?
त्या दिवशी वेगवेगळ्या ग्रूपवर ही कथा फिरत राहिली. आजच्या भाषेत ‘प्रचंड व्हायरल’ झाली. अदृश्य धाग्याने ओढल्या सारखी पुन्हापुन्हा ती लेखकाकडे येत राहिली. दोन दिवस या कथेचा ठसा पुन्हापुन्हा उमटत गेला.
या अनुभवाविषयी लेखकाने लिहिले,
‘हे मेसेज वाचताना मला खलील जीब्रानचे वाक्य आठवले.
‘What I say with one heart will be said tomorrow by thousands of hearts.’
‘आज अकस्मात अनेक हृदयांनी माझी कथा सांगितली.
लेखकाच्या जीवनात याहून मोठा आनंद काय असू शकेल?’
ती कथा ‘अभिजित प्रकाशन’ च्या अभिजित वाळिंबे यांनी उचलली. तिच्यात ‘दुर्बीण’ ही त्याच पात्रांची दुसरी कथा मिसळली, व एक देखणे पुस्तक तयार केले.