प्रथम कालखंड - द्वितीय कालखंड
विजय पाडळकर यांचा जन्म ४ ऑक्टोबर१९४८ रोजी बीड, (मराठवाडा, महाराष्ट्र) येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील पाडळी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील वसंतराव पाडळकर हे उप-शिक्षणाधिकारी होते तर आई वासंतिका [कालिंदी] या गृहिणी होत्या. वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत, म्हणून विजय पाडळकर यांचे शिक्षण देगलूर, कंधार, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या गावी झाले. इ.स. १९७२ साली ते नांदेडच्या पीपल्स कॉलेजमधून एम.कॉमची परीक्षा प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. कॉलेज शिक्षण घेत असतानाच, इ.स. १९७० साली, विजय पाडळकर यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरी पत्करली.
२५ जानेवारी १९७७ रोजी विजय पाडळकर यांचा विवाह अंबाजोगाई येथील पुष्पा विष्णुपंत कह्राडे यांच्याशी झाला. या दांपत्यास क्षिप्रा, क्षमा, मुग्धा आणि क्षितीज अशी चार मुले आहेत. बँकेच्या नोकरीत पाडळकरांनाही वरचेवर बदल्यांना सामोरे जावे लागले. मात्र नोकरीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच इ.स. २००१ साली त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. |
प्रथम कालखंड
विजय पाडळकर यांनी कॉलेजमध्ये असतानाच लेखनास सुरुवात केली होती. त्यांची पहिली कथा १९६८ साली पीपल्स कॉलेजच्या मासिकात प्रकाशित झाली. या वर्षीच्या कथा स्पर्धेत त्यांना पहिले बक्षीस मिळाले. पुढे दोन वर्षे त्यांनी कॉलेजच्या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले. ‘किर्लोस्कर’ या त्या काळाच्या लोकप्रिय मासिकात त्यांच्या काही कविताही प्रकाशित झाल्या. मात्र या काळात त्यांनी लेखनाकडे फारसे गंभीरपणे पाहिले नाही.
विजय पाडळकर यांचे नियमित लेखन सुरू झाले ते १९८४ साली. मराठवाडा विभागातील अग्रेसर दैनिक ‘मराठवाडा’ मध्ये त्यांनी ‘अक्षर संगत’ या नावाचे साप्ताहिक सदर सुमारे दीड वर्षे लिहिले. या लेखनाची सर्व स्तरावर अतिशय प्रशंसा झाली. ‘पुस्तकातील मजकुराचा योग्य तऱ्हेने उपयोग करीत पुस्तकाची ओळख करून द्यायची व तसे करतानाच मोकळेपणाने व ललित लेखनाच्या पद्धतीप्रमाणे आपला अभिप्राय नोंदवीत जायचा ही तुमच्या लिहिण्याची पद्धत मला नवीन आणि आकर्षक वाटली.’ असे या लेखनाबद्दल श्रेष्ठ लेखक विश्राम बेडेकर यांनी लिहिले. १९८६ साली या सदरातील निवडक लेखांचे संकलन स्वयंप्रभा प्रकाशन, नांदेड तर्फे प्रकाशित झाले. या पुस्तकाला प्रतिष्ठेचा ‘वाल्मिक पुरस्कार’ मिळाला. या पुस्तकामुळे आस्वादक समीक्षक म्हणून पाडळकर यांचे नाव सुप्रतिष्ठित झाले. १९८७ सालच्या ‘हंस’ च्या दिवाळी अंकात पाडळकरांनी आर.के.नारायण यांची ‘गाईड’ ही कादंबरी व तिच्यावर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ हा चित्रपट यांच्या साम्य भेदांची चर्चा करणारा लेख लिहिला. हा साहित्य आणि चित्रपट या कलांचे तुलनात्मक विश्लेषण करणारा मराठीतील पहिला लेख होय. यानंतर पाडळकरांनी सिनेआस्वादाच्या या दिशेने अधिक लेखन करण्यास सुरुवात केली. |
इ.स. १९९० साली विजय पाडळकरांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीत जागतिक कथेचा मागोवा घेत कथा या साहित्य प्रकारचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘कथांच्या पायवाटा’ ही लेखमाला लिहिली. जगातील काही महत्त्वाच्या कथाकारांचे कार्य आणि त्यांच्या एका लक्षणीय कथेचे विश्लेषण अशी रचना असलेली ही लेखमालाही गाजली.
गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रपट यांच्यातील साम्य भेदांची चर्चा करणारे पाडळकरांचे नऊ लेख ‘चंद्रावेगळे चांदणे’ [१९९५] या पुस्तकात एकत्रित केलेले असून या पुस्तकासाठी पाडळकर यांना पहिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. तसेच या पुस्तकासाठी त्यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘नरहर कुरुंदकर’ पुरस्कारही प्राप्त झाला. १९९८ साली पाडळकर यांनी लिहिलेली ‘गाण्याचे कडवे’ ही कुमार कादंबरी प्रकाशित झाली व तिला महाराष्ट्र शासनाचा कुमार-साहित्यासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला. आस्वादक साहित्यसमीक्षेचे त्यांचे यानंतरचे पुस्तक ‘रानातील प्रकाश’ हे १९९९ साली प्रकाशित झाले. ‘डॉन किहोते’ [क्विझोट] ही म्युगुएल डी सर्वांतीस याची जगप्रसिद्ध, श्रेष्ठ कादंबरी. या कादंबरीचा वाचकांवर तर प्रचंड प्रभाव पडलाच पण असंख्य कलावंतांना व लेखकांनाही तिने मोहिनी घातली. जगातील चार श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतीवर या कादंबरीच्या पडलेल्या प्रभावाचे आस्वादक विश्लेषण करणारे ‘मृगजळाची तळी’ हे पाडळकरांचे पुस्तक इ.स. २००० मध्ये प्रकाशित झाले. |
द्वितीय कालखंड
साहित्य आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील अनेक प्रकल्प विजय पाडळकरांना खुणावत होते. मात्र या प्रकल्पांसाठी, बँकेतील वाढत्या जबाबदाऱ्या सांभाळून, पुरेसा वेळ देणे शक्य नाही हे ध्यानात आल्यामुळे त्यांनी ३१ जानेवारी २००१ रोजी बँकेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. चित्रपट या कलेचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांनी ‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेचा ‘फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स’ केला. १४ मे ते ९ जून २००१ या चार आठवड्यांच्या शिक्षणक्रमात आलेल्या अनुभवांची नोंद त्यांनी आपल्या डायरीत केली व नंतर ते लेखन विस्ताराने ‘अंतर्नाद’ मासिकातून क्रमशः प्रकाशित झाले. या लेखनाचे पुस्तकरूप ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’ या नावाने ‘मौज प्रकाशन’ मुंबई यांनी २००६ साली प्रकाशित केले.
नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी, १९९६ ते १९९९ या काळात पाडळकरांनी ललित मासिकांत ‘वाटेवरले सोबती’ या नावाचे एक सदर लिहिले. पुस्तकातून मनात येऊन बसलेले व आता वाटेवर सोबत चालणारे अनेकजण पाडळकरांना वाचनाच्या प्रवासात भेटले होते. त्यांची आठवण जागविणारे आणि त्यांची ओळख वाचकांना करून देणारे हे लेखन लोकप्रिय बनले. हे लेख पुढे २००२ साली ‘वाटेवरले सोबती’ याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. विविध प्रकारचे आस्वादक ललित लेखन करीत असताना विजय पाडळकर हे स्वतंत्र कथाही लिहित होते. त्यांच्या कथा ‘हंस’, ‘दीपावली’, ‘अंतर्नाद’ अशा मासिकांतून प्रकाशित होत होत्या. ‘लहानशा घटितापासून तो मोठा अवकाश व्यापणारे, अनुभवानुकूल आकार घेणारे हे कथालेखन ‘पाखराची वाट’ [२००३] या त्यांच्या कथा संग्रहात समाविष्ट करताना पाडळकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या १५ लघुतम कथा, दहा कथा आणि एक दीर्घकथा एकत्रित करण्यात आल्या आहेत. कथेच्या साऱ्याच विभ्रमांची मनोहर रूपे येथे पहावयास मिळतात. या संग्रहाबद्दल श्रेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी लिहिले, ‘‘तुम्ही स्वत: उत्तम कथाकार आहात आणि कथा या साहित्यप्रकाराची तुम्हाला फार चांगली जाण आहे. ‘लघुतम कथा’ या वाड़मयप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याची मोलाची कामगिरी तुम्ही केली आहे.’ |
सत्यजित राय हे सर्वश्रेष्ठ जागतिक चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक. त्यांचे बहुसंख्य चित्रपट गाजलेल्या साहित्य कृतींवर आधारलेले आहेत. विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या आणि त्यावर आधारित राय यांचे ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’, व ‘अपूर संसार’ हे तीन चित्रपट यांचा तौलनिक अभ्यास करणारे पाडळकरांचे ‘नाव आहे चाललेली’ हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’ पुणे यांनी २००४ साली प्रकाशित केले. सत्यजित राय यांच्या ‘अपू त्रिवेणी’चा असा अभ्यास जगात प्रथमच केला गेला. या पुस्तकाची फार उत्तम दाखल घेतली गेली. अशोक राणे या श्रेष्ठ चित्रपट समीक्षकांनी या पुस्तकासंदर्भात लिहिले, ‘साहित्य आणि चित्रपट यांचा नातेसंबंध अभ्यासपूर्णरीत्या उलगडून दाखविणारे पुस्तक मराठीत हवेच होते. आपण हे काम केलेत, अतिशय आस्थेने केलेत. मनस्वीपणे केलेत. म्हणूनच आपले हे पुस्तक अत्यंत वाचनीय तर झाले आहेच पण वाचकांच्या चित्रपट विषयक जाणीवा विस्तारणारे झाले आहे.’
अंतोन चेकोव्ह हा विजय पाडळकरांचा अत्यंत आवडता कथाकार. या महान कथाकाराचे जीवन आणि त्याचे कथा साहित्य यांचा मर्मग्राही वेध घेणारा पाडळकर यांचा ग्रंथ- ‘कवडसे पकडणारा कलावंत’- मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई यांनी १ जुलै २००४ रोजी चेकोव्हच्या मृत्यू-शताब्दीचे निमित्त साधून प्रकाशित केला. रशियातील दुसरा श्रेष्ठ कथाकार गॉर्की याने चेकोव्हची एक आठवण लिहून ठेवली आहे. एकदा तो चेकोव्ह्ला भेटायला गेला तेव्हा चेकोव्ह बागेत एका झाडाखाली बसला होता. पानातून सूर्यप्रकाशाचे कवडसे खाली उतरत होते. चेकोव्ह्ने डोक्यावरील हॅट काढली व तिच्यात ते कवडसे पकडून कवडश्यासह हॅट डोक्यावर घालण्याचा तो प्रयत्न करीत होता व ते जमत नाही म्हणून लहान मुलासारखा चिडत होता. पाडळकरांचे पुस्तक म्हणजे चेकोव्ह्च्या जीवनातील व साहित्यातील सत्त्यांचे कवडसे पकडण्याचा प्रयत्न आहे.
या ग्रंथाचे वाचकांनी व समीक्षकांनी उत्तम स्वागत केले. महाराष्ट्र राज्य पुरस्कार २००४-०५, बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी आणि केशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबई इत्यादी पुरस्कारांनी त्याचा गौरव करण्यात आला. आस्वादक समीक्षेचा उत्तम नमुना म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. सर्वोत्तम जागतिक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा, अकिरा कुरोसावा या जपानी दिग्दर्शकाचा, ‘राशोमोन’ हा चित्रपट आणि तो ज्या दोन लघुकथांवर आधारित आहे त्या कथा यांचा वेध घेणारे व ‘राशोमोन’चा सांगोपांग अभ्यास करणारे ‘गर्द रानात भर दुपारी’ हे पाडळकर यांचे पुस्तक ११-२-२००७ रोजी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते नांदेड येथे प्रकाशित झाले. याप्रसंगी गुलजार म्हणाले, ‘पाडळकर करीत असलेला साहित्य आणि सिनेमा या दोन कलांचा अभ्यास अत्यंत मोलाचा असून तो या पद्धतीने भारतात यापूर्वी कोणीही केलेला मला ठाऊक नाही’ |
‘भ्रम आणि भ्रमनिरास’ या चक्रांतून माणूस सारखा फिरत असतो’ या आशयसूत्राभोवती गुंफलेली श्री. पाडळकर यांची ‘अल्पसंख्य’ ही कादंबरी मार्च २००८ मध्ये ‘राजहंस प्रकाशन, पुणे’ यांच्यातर्फे प्रकाशित झाली. ‘अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणाऱ्या ‘त्याच न त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी, बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ‘अल्पसंख्य’ आणि ‘बहुसंख्य’ या दोन्ही प्रकारच्या सामान्य माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी, कोणताही अभिनिवेश नसणारी ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी आहे.
‘विचार करणारा माणूस हा ‘अल्पसंख्य’च असतो’ हे सत्य प्रभावीपणे मांडणाऱ्या या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा ‘श्री. ना. पेंडसे’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
श्रेष्ठ कवी आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या चित्रपट दिग्दर्शकीय कारकीर्दीचा संपूर्ण आढावा घेण्याचा संकल्प विजय पाडळकर यांनी केला. या कामी गुलजार यांनी त्यांना मोलाची साथ दिली. पाडळकरांनी गुलजार यांची सुमारे वीस तास दीर्घ मुलाखत घेतली. गुलजारांचे सारे सोळा चित्रपट पाहून, अभ्यासून, त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून पाडळकरांचा ‘गंगा आये कहां से’ हा ग्रंथ निर्माण झाला. या पुस्तकासाठी प्रास्ताविक लिहितांना गुलजार यांनी ‘हिंदुस्तान की हर भाषा को सिनेमा पर लिखने के लिये एक पाडलकर की जरूरत है’ असे उद्गार काढले. हा ग्रंथ मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांनी ऑगस्ट २००८ मध्ये प्रकाशित केला. या लेखनासाठी पाडळकर यांना महाराष्ट्र शासनाचा ‘पु.ल. देशपांडे पुरस्कार’ मिळाला.
जगातील सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तीवर, तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारी लेखमाला विजय पाडळकर यांनी २००८ साली ‘लोकसत्ता’ दैनिकात वर्षभर लिहिली. एका साक्षेपी अभ्यासकाने व अभिजात रसिकाने घेतलेला कलेचा हा लालित्यपूर्ण वेध जाणकारांना व सामान्य वाचकांनाही फार आवडला. सुमारे ५०० अभिजात चित्रपटांचे संदर्भ असलेल्या त्या लेखमालेचे ग्रंथरूप २०१० साली ‘सिनेमायाचे जादुगार’ या नावाने ‘यक्ष प्रकाशन’ तर्फे प्रसिद्ध झाले. जागतिक सिनेमाच्या विशाल विश्वाची ओळख ज्याला करून घ्यावयाची आहे त्याच्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.
विजय पाडळकरांची दुसरी कादंबरी ‘कवीची मस्ती’ ही २०१४ साली ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस’ मुंबई तर्फे प्रकाशित झाली. या कादंबरीत पाडळकर यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. ‘डॉन क्विझोट’[किहोते] ही सर्वांतीस याची कादंबरी जगातील पहिली आधुनिक कादंबरी मानली जाते. ती एक महान आणि कालजयी कलाकृती आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. या कादंबरीचा जगभरच्या विचारवंतांवर आणि लेखकांवर प्रभाव पडला आहे. या कादंबरीतील ‘डॉन’ आणि ‘सांचो’ ही पात्रे या काळात आणि महाराष्ट्रात आली तर ती कोणत्या रूपात अवतरतील अशी विलक्षण संकल्पना घेऊन लिहिलेली ही कादंबरी. ही काल्पनिक असली तरी तिला वास्तवाचा भक्कम आधार आहे कारण ‘सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण असते’ असा लेखकाचा दावा आहे. या कादंबरीबद्दल डॉ. सुधीर रसाळ यांनी ‘‘या जातीची कादंबरी मराठीत यापूर्वी कुणीही लिहिली नाही.’ असे मत व्यक्त केले आहे.

अभिजात साहित्य आणि चित्रपट यांच्या इतकेच विजय पाडळकरांचे हिंदी सिने संगीतावर प्रेम आहे. गाणी ऐकण्याच्या छंदातून ते गाणी जमविण्याच्या छंदाकडे वळले. दहा हजाराहून अधिक हिंदी सिने गीतांचा त्यांचा संग्रह आहे. हा छंद जोपासतांना त्यांच्या ध्यानात आले की हिंदी चित्रपटातील गीतकार हा अतिशय दुर्लक्षित घटक आहे. ज्यांनी हा सिने संगीताचा कारवा पुढे नेला आहे अशा गीतकारांपैकी कित्येक जण आज विस्मृतीच्या काळोखात लुप्त झाले आहेत. शैलेंद्र, साहीर, मजरूह, राजेंद्र कृष्ण अशा सुप्रसिद्ध गीतकारांसोबतच अलक्षित अशा वली साहेब, पंडित इंद्र, सरशार सैलानी, कैफ इरफानी, शमीम जयपुरी वगैरे कवींच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणारा हा आगळा वेगळा ग्रंथ. हा विश्वसनीय इतिहास आहे, ही एक वाचनीय बखर आहे आणि आजच्या युगातील एका महत्त्वाच्या कलेचा अभ्यासपूर्ण आस्वाद देखील आहे. ‘बखर गीतकारांची’ या ग्रंथात ज्ञात-अज्ञात अशा ८९ गीतकारांबद्दल पाडळकरांनी जाणकारीने व जिव्हाळ्याने लिहिले आहे. १००० हून अधिक अप्रतीम गाण्यांचे संदर्भ असलेला हा मौल्यवान संदर्भ-ग्रंथ २०१४ साली ‘मैत्रेय प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे.
हिंदी चित्रपटांविषयी मराठीत भरपूर लेखन झालेले असले तरी हिंदी सिनेमाचा इतिहास पूर्वी कुणी सांगितला नव्हता. पाडळकर यांनी २०१३ साली हा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी सुमारे २०० चित्रपटांच्या सी.डी. मिळवून ते चित्रपट त्यांनी पुन्हा पाहिले. त्यांच्याविषयीची माहिती मिळविली. या अभ्यासातून हिंदी सिनेमाचा विसाव्या शतकात विकास कसा झाला याचे रूप त्यांच्या मनात निर्माण झाले. ह्या विषयाचा आवाका फार मोठा असल्या कारणाने त्यांनी तो दोन खंडात प्रकाशित करण्याचे ठरविले आहे.

‘देवदास ते भुवन शोम’ या २०१५सालि ‘मैत्रेय प्रकाशन, मुंबई’ यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्या खंडात सुमारे पंचाहत्तर हिंदी चित्रपटांचा अभ्यास सादर केलेला आहे. वेगवेगळ्या कालखंडात हिंदी सिनेमाला कसे नवे नवे कलाकार मिळत गेले, त्यांनी कोणते प्रयोग सिनेमात केले आणि कलेची पालखी कशी पुढे नेली याचे तपशीलवार वर्णन या ग्रंथात केलेले आहे. ज्यांनी हे चित्रपट आधी पाहिले असतील त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद तर मिळेलच पण या चित्रपटाची पूर्वी ध्यानात न आलेली सौंदर्यस्थळे देखील त्यांना दिसतील. गॉसिपला मुळीच थारा न देता शक्यतो काटेकोरपणे हा इतिहास मांडला असल्यामुळे तो एक विश्वसनीय दस्तऐवज बनला आहे.
शेक्सपिअर हा जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार समजला जातो. सामान्य वाचकांपासून ते अभिजात कलावंतांपर्यंत, लेखकांपर्यंत, तत्त्वचिंतकांपर्यंत असंख्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याच्या नाटकांची मोहिनी जगभरातील महान चित्रपट दिग्दर्शकांवर देखील पडलेली असून त्याच्या नाटकांवर आजवर चारशेपेक्षा अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. शेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयषाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा तौलनिक अभ्यास करणारा ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ हा ग्रंथ विजय पाडळकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. २०१६ साली जगभर शेक्सपिअरची चारशेवी पुण्यतिथी साजरी केली गेली. हे औचित्य साधून ‘मौज प्रकाशन मुंबई’ यांनी प्रकाशित झालेल्या या ग्रंथात गेल्या पंधरा वर्षांपासून पाडळकर करीत असलेल्या साहित्य आणि चित्रपट या दोन कलांच्या सखोल अभ्यासाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. |
सत्यजित राय या महान चित्रपट दिग्दर्शकाचे बहुसंख्य चित्रपट हे कुठल्या न कुठल्या साहित्यकृतीवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा चित्रपटांची समीक्षा करताना मूळ साहित्य कृतीचा संदर्भ घेतला तर साहित्य आणि चित्रपट या दोन्ही कलांची बलस्थाने समजू शकतात. विभूती भूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या [आणि त्यावर आधारित राय यांचे तीन चित्रपट], रवींद्रनाथ टागोरांच्या चार कथा [व त्यांवर आधारित राय यांचे चार चित्रपट], प्रेमचंद यांची कथा तसेच इब्सेन याचे नाटक [आणि त्यावर आधारित दोन चित्रपट] अशा विविध कलाकृतींचा अभ्यास पाडळकरांनी, 2016 साली प्रकाशित झालेल्या ‘गगन समुद्री बिंबले’ या ग्रंथात सादर केला आहे. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणेच होय....
जागतिक साहित्यात आपला अमिट ठसा उमटविणारा प्रतिभावान अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट हा एकीकडे अमेरिकेचा सर्वांत लाडका व सर्वश्रेष्ठ कवी मानला गेला तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची आग पाखडणारी टीकाही झाली. रॉबर्ट फ्रॉस्ट खरा होता तरी कसा? कवीचे जीवन आणि त्याची कविता यांचा परस्परसंबंध शोधणारा विजय पाडळकर यांचा अभ्यासपूर्ण आणि आस्वादक चरित्र ग्रंथ, ‘कवितेच्या शोधात’ हा 2018 साली राजहंस प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला. अमेरिकेत जवळजवळ एक वर्ष राहून अनेक संदर्भग्रंथ, चरित्रे, पत्रव्यवहार, डायऱ्या व आठवणी तपासून सिद्ध केलेली ही एक अजोड चरित कहाणी. या ग्रंथाला ‘महाराष्ट्र ग्रन्थोत्तेजक संस्था’ पुणे यांचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘कथेविषयीचे पाडळकरांचे प्रेम हे सर्वांगीण आणि डोळस आहे. कथेचा रूपाकार, तिची केंद्रवर्ती सूत्रे, तिचा आशय, तिचा उद्देश आणि तिचा परिणाम या सर्वांविषयी त्यांना निश्चितपणे काही सांगावयाचे असते. पाडळकर हे कथामहात्म्याचे दार्शनिक आहेत.’ असे मत प्रख्यात समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी ज्यांच्याबद्दल व्यक्त केले त्या, जागतिक कथा साहित्याचे साक्षेपी वाचक आणि अभ्यासक विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या ४४ लघुतम कथांचा आकर्षक संग्रह-‘छोट्या छोट्या गोष्टी’.
लघुतम कथा’ या मराठी साहित्यांत काहीसा अलक्षित असलेल्या वाङ्मयप्रकाराची सामर्थ्ये समर्थपणे प्रकट करणारा हा संग्रह 2018 साली प्रकाशित झाला.
सुमारे 1974 सालापासून पाडळकर हे जी.ए. कुलकर्णी यांच्या कथेचा अभ्यास करीत आहेत. चित्रकलेत Impossible Triangle या नावाची एक संकल्पना आहे. या त्रिकोणाचा आकार भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा आहे या त्रिकोणाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ कागदावरच असू शकतो. प्रत्यक्षात कुणीही असा त्रिमिती त्रिकोण तयार करू शकत नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा वाचताना जाणवते की आयुष्याचा अर्थ शोधताना त्यांच्या हाती जे बिंदू लागले, त्यांच्यापासून ते असे अशक्यप्राय त्रिकोण तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना हेही माहीत असते की असे त्रिकोण फक्त कागदावरच मांडता येतात.... या त्रिकोणांमागे दडलेले बिंदू आणि ते सुचवीत असलेल्या रमलखुणा शोधण्याचा विजय पाडळकर यांचा हा प्रयत्न. जी.एंच्या निवडक कथांच्या रसग्रहणाचा एक अनोखा कॅलिडोस्कोप ‘जी.एंच्या रमलखुणा’ या नावाने 2018 साली प्रकाशित झाला.
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान गीताकारांत शैलेंद्र हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. लेखक विजय पाडळकरांनी गुलजार यांना एकदा ‘हिंदीतील सर्वश्रेष्ठ गीतकार कोण’ असा प्रश्न केला होता. त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले होते, “शैलेंद्र.” ‘ओ, सजना, बरखा बहार आई’, ‘आजारे परदेसी’, ‘ जीना इसीका नाम है’, ‘आज फिर जीने की तमन्ना है’ अशी असामान्य मधुर आणि अर्थपूर्ण गीते त्यांनी लिहिली. १७७ चित्रपटांसाठी लिहिलेल्या जवळपास आठशे गीतांचा खजिना आपल्यासाठी सोडून गेलेल्या महान गीतकाराचे जीवन आणि त्याचे कार्य यांचा वेध घेत त्यांच्या अजरामर गीतांचा रसास्वाद घेणारा ‘सुहाणा सफर और-‘ हा आगळावेगळा ग्रंथ डिसेंबर 2018 मध्ये ‘रोहन प्रकाशन’ पुणे यांनी प्रकाशित केला.
विजय पाडळकरांनी सातत्त्याने जागतिक चित्रपटातील वेधक, महत्त्वपूर्ण चित्रपटासंदर्भात आस्वादक आणि अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. या लेखनापैकी काही निवडक लेख 2019 साली प्रकाशित झालेल्या ‘आनंदाचा झरा’ या पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. ‘ज्या चित्रपटांनी निखळ आनंद दिला आहे असे चित्रपट’ हे या निवडीमागचे सूत्र आहे. सत्यजित राय, अकिरा कुरोसावा, इंगमार बर्गमन, फ्रांक काप्रा, मृणाल सेन अशी जगप्रसिद्ध नावे यात आहेतच शिवाय हयातो मियाझाकी, हुओ जीयांकी व अल्बर्ट लामोरीसे अशा तुलनेने कमी प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या रम्य कलाकृतींचा रसास्वाद देखील वाचकाला येथे वाचावयास मिळेल.
या पुस्तकाबद्दल ‘ललित’ एप्रिल २०२१ च्या अंकात प्रतिभा सराफ लिहितात, ‘-असे आपल्याही मनात झुळझुळणारे चित्रपट ‘आनंदाचा झरा’ वाचताना आठवतील आणि पाडळकर यांनी ज्या चित्रपटाविषयी आनंदाने व अभ्यासपूर्ण लिहिले आहे तेही पाहण्यास आपल्याला निश्चितच प्रवृत्त करतील.’
जग म्हणजे दवबिंदू?
असेलही
तरीही...
जपानी साहित्यात हायकू या काव्यप्रकाराला दीर्घ परंपरा आहे. बाशो, बुसॉ आणि इस्सा हे जपानचे तीन श्रेष्ठ कवी. हायकूला त्यांनी प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून दिली. या तीन महाकवींचे जीवन आणि त्यांचे कार्य यांची माहिती करून देणारा व त्यांच्या सुमारे पाचशे हायकुंचे भावानुवाद सादर करणारा मराठीतील एक नाविन्यपूर्ण ग्रंथ पाडळकरांनी 2019 साली प्रकाशित केला. हायकू या काव्यप्रकाराची चिकित्सा करणारी व त्याची वैशिष्ट्ये विषद करणारी दीर्घ प्रस्तावना हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ठ्य. दि. ६ जून २०१९ रोजी पुणे येथे ‘घंटेवरले फुलपाखरू’ या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या,
‘कवी कविता लिहितो हाच एक अनुवाद असतो. अनुवादात समरसता आणि एकरूपता असणे आवश्यक असते. जपान मधील तीन महाकवींच्या पाचशे हायकुंचा अनुवाद करणारे हे पुस्तक मराठी वाचकांसाठी मेजवानी आहे. अनुवादासाठी तर हे वाचायलाच हवे पण पाडळकर यांनी त्यांत विषद केलेल्या अनुवादानुभवासाठीही वाचायला हवे. हायकुंचे प्राणतत्त्व काय आहे हे समजावून सांगणारे व हायकू संदर्भातील आपली जाण समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. कुठेही बोजड नसणारी, साधी, प्रवाही अनलंकृत भाषा हे वैशिष्ट्य असणाऱ्या या अनुवादातून कवितेचे अंतरंग किती खोल असते हे वाचकाला जाणवेल. पाडळकर हे रुळलेला मार्ग सोडून पलीकडल्या वाटा धुंडाळणारे कविमनाचे लेखक आहेत.’
‘गाण्याचे कडवे’ नंतर खूप वर्षानी, 2021 साली पाडळकरांनी नवी कुमार कादंबरी ‘गोजी, मुग्धा आणि करोना’ लिहिली. गोजी नावाच्या, हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या, हुशार आणि तल्लख कल्पनाशक्ती असलेल्या मुलीच्या आयुष्यातील हे एक ‘नवल-पर्व’. तिला जी.ए.कुलकर्णी यांच्या ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या पुस्तकातील मुग्धा एकदा भेटते. गोजी म्हणते, “पुस्तकातील माणसे खरी असतात काय?” मुग्धा सांगते, “असतात. पण जे पुस्तकावर प्रेम करतात त्यांनाच ती भेटतात.” या कल्पनेभोवती रचलेली ही कादंबरी चांगलीच लोकप्रिय झाली. श्रेष्ठ कथाकार भारत सासणे यांनी लिहिले, ‘
‘मुळात कल्पना खूपच चांगली, म्हणजे ‘ओरीजीनल’. त्यामुळे कथावस्तू अत्यंत औत्सुक्यपूर्ण झाली आहे. पुस्तकातून [ज्ञान- शहाणपण-विस्डम] बाहेर येणारी मुलगी [खर तर ही गोजीच आहे, म्हणजे तिचे दुसरे रूप] आणि प्रत्यक्षातील मुलगी यांचा मेळ इंटरेस्टिंग आहे.’
सत्यजित राय यांच्याविषयीच्या अशा दुर्मिळ आठवणींनी सजलेला पाडळकरांचा ‘तो उंच माणूस’ हा ग्रंथ राय यांच्या जीवनाचा दीर्घ आढावा तर घेणारा आहेच पण त्यांच्या साऱ्या चित्रपटांच्या निर्मितीचा इतिहास सांगणारा देखील आहे. राय यांनी भारतीय सिनेमाचा चेहरा मोहराच कसा बदलून टाकला याचे दर्शनही या ग्रंथातून घडते.
या ग्रंथात पाडळकरांनी सत्यजित राय यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्मिती व तिचे भारतीय समाज जीवनावर झालेले परिणाम तर शोधले आहेतच शिवाय त्या निर्मितीमागे राय यांच्या कोणत्या प्रेरणा होत्या, जीवनविषयक व कला विषयक कोणते दृष्टीकोन होते, आपले कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी आपल्या क्षमतांचा कसा अथक पाठपुरावा केला, एक व्यक्ती म्हणून त्यांची स्वप्ने, त्यांनी जोपासलेली मूल्ये, त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा कोणत्या होत्या यांचाही वेध घेतला गेला आहे.
राय आपणा सर्वासाठी एक समृद्ध वारसा सोडून गेले आहेत. तो जतन करणे व इतरांपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून लिहिलेले हे महा-चरित्र 2022 साली मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले. या ग्रंथास प्रतिष्ठेचा ‘लोकमंगल पुरस्कार’ मिळाला.
2023 साली सोलापूर येथील ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ ने साहित्य आणि कला यांचा सारख्याच सामर्थ्याने आस्वाद घेणार्या लेखकास ‘कला स्वाद’ पुरस्कार देण्याचे ठरविले. पहिलाच पुरस्कार श्री पाडळकर यांना त्यांच्या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला.
विजय पाडळकर यांनी जी.एंच्या कथा विश्वाचा वेध घेण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग ‘अनंतयात्री’ या कथा संग्रहातून केला आहे. या संग्रहातील आठ कथांत जी.एंच्या कथांचे, त्यांच्या जीवन दर्शनाचे व त्यांतील रमलखुणांचे ‘प्रतिबिंब’ पकडण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. ज्यांचे जी.एंच्या लेखनावर प्रेम आहे, अशांनी आणि जी.एंच्या कथांचा अभ्यास करू पाहणार्या अभ्यासकांनी आवर्जून वाचला पाहिजे असा हा आगळा वेगळा कथासंग्रह 2023 साली प्रकाशित झाला.
याच वर्षी पाडळकरांची, ‘अल्पसंख्य’ आणि ‘कवीची मस्ती’ या कादंबर्यानंतरची, आत्मशोधाच्या वाटेवरील प्रवासाचा वेध घेणार्या संकल्पित ‘कादंबरी चतुष्टयातील तिसरी कादंबरी ‘गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे गाव’ प्रकाशित झाली. परतून कुणूही घराकडे जाऊ शकत नाही हे आधुनिक साहित्यातील एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे. तरीही माणसे आपल्या भूतकाळाकडे जाऊ पाहतात. काय हवे असते त्यांना? त्यांना जे मिळते ते खरेच मौल्यवान असते का? माणसे जे प्रश्न घेऊन मागे जातात त्यांची उत्तरे त्यांना मिळतात का? असे प्रश्न घेऊन आपल्या भूतकाळाकडे वळलेल्या आणि हा प्रवास शब्दबद्ध करू पाहणार्या एका लेखकाला अचानक एक आकृतीबंध सापडतो. कलाकृतीचा आणि जीवनाचाही. त्याला जाणवत जाते, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असा अट्टहास नकोच बाळगायला. कारण या प्रवासात एक वेगळा आनंद आहे आणि तसाच तो या प्रवासाची गोष्ट सांगण्यातही आहे…
ही एक ‘वास्तव-काल्पनिका’ आहे की ‘कल्पित सत्यकथा’ याचा निर्णय लेखकाने वाचकांवर सोपविला आहे.

अनुवादित पुस्तके :
आपली विपुल ग्रंथ निर्मिती करीत असताना विजय पाडळकरांनी काही अप्रतीम साहित्य कृतींचे अनुवाद देखील केले. ‘बनफूल’ या बंगाली लेखकाच्या ‘भुवन शोम’ या कादंबरीचा त्यांनी त्याच नावाने अनुवाद केला. सुप्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक यांच्या ‘रावीपार’ या कथासंग्रहाचा त्यांनी केलेला अनुवाद विशेष गाजला. गुलजार यांच्याच ‘आंधी’[पटकथा], ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ [निवडक कविता], आणि ‘बोस्कीचे कप्तान काका’ [बाल साहित्य] या पुस्तकांचाही अनुवाद त्यांनी केला आहे. इतर : महाराष्ट्र बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विजय पाडळकर यांनी ‘यक्ष’ या दिवाळी अंकाची निर्मिती आणि संपादन सुरु केले. २००१ साली त्यांनी संपादन केलेल्या ‘यक्ष’ दिवाळी अंकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रथम पुरस्कार मिळाला. २००२ व २००३ चे दिवाळी अंकही सामान्य रसिक व जाणकारांच्या प्रशंसेस पात्र ठरले. १९९६ साली उदगीर येथे भरलेल्या पहिल्या ‘लातूर जिल्हा साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद विजय पाडळकर यांनी भूषविले होते. पाडळकर हे २०१० साली ठाणे येथे संपन्न झालेल्या ‘ठाणे जिल्हा साहित्य संमेलना’चेही अध्यक्ष होते. रसिकांना अभिजात जागतिक चित्रपट पहावयास मिळावेत म्हणून विजय पाडळकर यांनी नांदेड येथे २००७ साली ‘मॅजिक लॅन्टर्न फिल्म सोसायटी’ स्थापन केली. ‘मौज प्रकाशन मुंबई’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘जी. एं.ची पत्रे’ [खंड ३ व ४ ] या पुस्तकांना पाडळकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावना विशेष गाजल्या आहेत. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘पिंजरा’ या कथेवर आधारित ‘पिंजरा’ या लघुपटाची निर्मिती पाडळकरांनी केली आहे. पाडळकरांच्या ‘सभा’ या कथेवर शशिकांत लावणीस यांनी ‘सभा’ या नावाचा लघुपट तयार केला आहे. |