प्रकाशक: अरिहंत पब्लिकेशन पुणे.[दुसरी आवृती]
प्रथमावृत्ती: १९९८
चालू आवृत्ती : २०१३ |
किंमत: १६०/-
पृष्ठे: १४४
|
पुरस्कार : महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९९७-९८
अर्पणपत्रिका :
कै. ताईस,
हे गाण्याचे कडवे गुणगुणण्यास तू हवी होतीस....

ललित लेखक विजय पाडळकर यांची ही पहिली कुमार कादंबरी.
एका कुमारवयीन मुलीच्या जीवनातील तीन वर्षांची ही कहाणी.
हे तिचे उमलण्याचे दिवस. ह्याच दिवसांत तिची भेट ऊन-पावसाशी होते, चंद्र सूर्यांशी होते, फुलांशी होते, रंगांशी होते.
नवी नाती जुळत जातात. मनाचे आकाश फैलावत जाते. प्रत्येक दिवशी एक नवा तारा या आकाशात उगवतो. नवे रस्ते भेटतात. नवी माणसे भेटतात. वाहता वाहता विस्तारत जाणाऱ्या नदीच्या पात्रासारखे तिचे आयुष्य पुढे सरकत जाते.
तिच्या मनावर पडलेल्या जगाच्या प्रतिबिंबांची ही कहाणी आहे, तशीच ती तिच्या आई वडिलांची, भावाबहिणींची, आणि सोबत्यांचीही कहाणी आहे. जगतांना अपार उत्साहाने ती जे अनुभवाचे कण वेचीत जाते त्या कणांची ही कहाणी आहे. तिच्याच शब्दांत तिने सांगितलेली ही कहाणी प्रत्येक कुमारवयीन मुलाला आपली तर वाटेलच पण प्रौढांना देखील आपल्या बालपणीच्या हरवलेल्या दिवसांची ती आठवण करून देईल. यामुळे हे कुमार वाड़मयासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार मिळालेले हे पुस्तक बाल वाचकांसाठी तर आहेच पण, बालपण जे विसरलेले नाहीत अशा मोठ्यांसाठी देखील आहे.

तुमचा संग्रह वाचून किती आनंद झाला हे कसे सांगणार? ‘बदली’ या पहिल्याच लेखनाने मी त्या मुलीच्या हळुवार जगात प्रवेश केला. प्रवास नकळत चालू राहिला. आणि शेवटचे ‘बाग’ हे लेखन बऱ्याच वेळाने आले. कारण सर्वच लेखनातील कितीतरी भाग पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. या सर्व संवेदनामध्ये मी इतका समरस झालो की हे लेखन पाडळकरांचे आहे की माझे असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. घरासमोरची बाग सोडाच पण एका कुटुंबाची बाग बहरतांना पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळत आहे असं वाटलं. प्रत्येक व्यक्तिरेखा पाऱ्यासारखी असली तरी, साध्या सुंदर भाषेत रंगविलेली. तुमची शैली सुबोध, सरळ आणि आशय थेट भिडणारा.
---प्रकाश संत