अर्पणपत्रिका:
कै. नानांस,
माझ्या अस्तित्त्वावरील तुमच्या खुणा आता अधिक स्वच्छ जाणवू लागल्या आहेत.
कै. नानांस,
माझ्या अस्तित्त्वावरील तुमच्या खुणा आता अधिक स्वच्छ जाणवू लागल्या आहेत.
‘The source of inspiration of cinema is magic. A good film never loses touch with the magic lantern behind it. ‘ Stanley Cavell
‘सिनेमायाचे जादुगार’ हे चित्रपटकलेचा अभ्यास करणाऱ्यासाठी अत्यावश्यक असे मराठी पुस्तक आहे. जागतिक चित्रपटांचे विशाल विश्व समजून घेण्यासाठी उचलणे आवश्यक असलेले हे पहिले पाउल. चित्रपट कलेत रुची निर्माण झाली की आपोआप मराठी किंवा हिंदी चित्रपटांच्या वर्तुळाबाहेर केवढे प्रचंड विश्व आहे याची जाणीव होऊ लागते. मात्र या विश्वात प्रवेश करण्यासाठी कुणीतरी वाटाड्या मिळणे गरजेचे असते. विजय पाडळकर हे असे जाणकार वाटाडे आहेत. त्यांचे बोट धरून या जगात प्रवेश केल्यावर मात्र येथून पुढला प्रवास प्रत्येक रसिकाने स्वत:च केला पाहिजे, पण त्या प्रवासात हे पुस्तक सदैव साथ देईल हे निश्चित.
सिनेमाच्या मायेची जादू पसरण्यास सुरू होऊन उणीपुरी शंभर वर्षे झाली आहेत. या कालावधीत या कलेच्या असंख्य जादूगारांनी-दिग्दर्शकांनी- आपल्या किमयेने सिनेमाची ही सृष्टी समृद्ध केली तिला अभिजात कलेचे रूप दिले. या दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तीवर, तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारी लेखमाला विजय पाडळकर यांनी २००८ साली ‘लोकसत्ता’ दैनिकात वर्षभर लिहिली. एका साक्षेपी अभ्यासकाने व अभिजात रसिकाने घेतलेला कलेचा हा लालित्यपूर्ण वेध जाणकारांना व सामान्य वाचकांनाही फार आवडला. त्या लेखमालेचे हे ग्रंथरूप.
पाचशेहून अधिक अभिजात चित्रपटांचे माहितीपूर्ण संदर्भ असलेले मराठीतील विलक्षण वेगळे पुस्तक. प्रत्येक विद्यालयाने व वाचनालयाने संग्रही ठेवला पाहिजे असा संदर्भग्रंथ.

आम्ही घरातील सर्वजण एकत्र येऊन आपले ‘सिनेमायाचे जादूगार’ हे पुस्तक वाचत आहोत. मराठीत चित्रपटासंदर्भात इतक्या विविध विषयांवर लिहिलेले दुसरे पुस्तक माझ्या तरी पाहण्यात आलेले नाही. मराठी साहित्यात ही मोलाची भर घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
---प्रभाकर पेंढारकर
लोकसत्ता मधून येणारे आपले चित्रपट विषयक सदर नियमितपणे वाचत असतो. चित्रपट रसिकांच्या दृष्टीने हा एक अनमोल खजिनाच आहे. ज्या लोकांची केवळ नावेच माहिती होती अशांचे जीवन, धडपड, कर्तृत्व ह्या सर्वांचा परिचय या लेखमालेमुळे झाला.
---वि. वि. फडके