अनंत यात्रीजी.एंच्या कथा विश्वाचा वेध घेण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग ‘अनंतयात्री’ या कथा संग्रहातून केला आहे. या संग्रहातील आठ कथांत जी.एंच्या कथांचे, त्यांच्या जीवन दर्शनाचे व त्यांतील रमलखुणांचे ‘प्रतिबिंब’ पकडण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. ज्यांचे जी.एंच्या लेखनावर प्रेम आहे, अशांनी आणि जी.एंच्या कथांचा अभ्यास करू पाहणार्या अभ्यासकांनी आवर्जून वाचला पाहिजे असा हा आगळा वेगळा कथासंग्रह.
|
पाखराची वाटजागतिक कथा साहित्याचे साक्षेपी वाचक आणि अभ्यासक विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या, स्वत:च्या विविध अनुभवांमधून निर्माण झालेल्या कथांचा संग्रह. लहानशा घटीतापासून तो मोठा अवकाश व्यापणारे, अनुभवानुकूल आकार घेणारे हे कथालेखन आहे. लघुतम कथा, कथा आणि दीर्घकथा या कथेच्या साऱ्याच विभ्रमांची मनोहर रूपे येथे पहावयास मिळतात.
या कथासंग्रहात पाडळकरांनी वेळोवेळी लिहिलेल्या १५ लघुतम कथा, दहा कथा आणि एक दीर्घकथा एकत्रित करण्यात आल्या आहेत.
|
छोट्या छोट्या गोष्टी
‘कथेविषयीचे पाडळकरांचे प्रेम हे सर्वांगीण आणि डोळस आहे. कथेचा रूपाकार, तिची केंद्रवर्ती सूत्रे, तिचा आशय, तिचा उद्देश आणि तिचा परिणाम या सर्वांविषयी त्यांना निश्चितपणे काही सांगावयाचे असते. पाडळकर हे कथामहात्म्याचे दार्शनिक आहेत.’ असे मत प्रख्यात समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी ज्यांच्याबद्दल व्यक्त केले त्या, जागतिक कथा साहित्याचे साक्षेपी वाचक आणि अभ्यासक विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या ४४ लघुतम कथांचा आकर्षक संग्रह.
लघुतम कथा’ या मराठी साहित्यांत काहीसा अलक्षित असलेल्या वाङ्मयप्रकाराची सामर्थ्ये समर्थपणे प्रकट करणारा संग्रह.
|
ठसा रेनर मारिया रिल्केने त्याच्या पत्रात लिहिले आहे-
‘भव्य आशय सूत्रांपासून आपली सुटका करून घ्या आणि तुमचे रोजचे जीवन तुम्हाला काय देते याबद्दल लिहा. तुमची लहानलहान सुखदु:खे, आशा आकांक्षा यांच्याबद्दल लिहा, तुमच्या मनात विहार करणाऱ्या विचारांबद्दल लिहा, आणि आयुष्यातील सौंदर्यावर असलेल्या तुमच्या विश्वासाबद्दल लिहा...’ जीवनावरचा प्रेमाचा ठसा आणि सौन्दर्यावरला विश्वास दृश्यमान करणाऱ्या विजय पाडळकरांच्या दोन लघुकथा – ‘ठसा’ आणि ‘दुर्बीण’. एका देखण्या, इवल्याशा पॉकेट बुक च्या रूपात. कधीही आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला भेट देण्यासाठी आदर्श पुस्तक!
|