अर्पणपत्रिका:
काळोखावर प्रकाश किरणांनी लेणी खोदणारे महाकवी
सत्यजित राय यांस

विजय पाडळकरांनी सातत्त्याने जागतिक चित्रपटातील वेधक, महत्त्वपूर्ण चित्रपटासंदर्भात आस्वादक आणि अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. या लेखनापैकी काही निवडक लेख या पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. ‘ज्या चित्रपटांनी निखळ आनंद दिला आहे असे चित्रपट’ हे या निवडीमागचे सूत्र आहे. सत्यजित राय, अकिरा कुरोसावा, इंगमार बर्गमन, फ्रांक काप्रा, मृणाल सेन अशी जगप्रसिद्ध नावे यात आहेतच शिवाय हयातो मियाझाकी, हुओ जीयांकी व अल्बर्ट लामोरीसे अशा तुअलनेने कमी प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या रम्य कलाकृतींचा रसास्वाद देखील वाचकाला येथे वाचावयास मिळेल.
‘The Red Balloon’ या चित्रपटाच्या शेवटी एक हृद्य प्रसंग आहे. लहान्या मुलाचा फुगा काही दुष्ट मुले फोडून टाकतात. पण त्याचवेळी साऱ्या गावातील फुगे आपली मूळ जागा सोडून त्या मुलाकडे येतात व त्याला आपल्यासोबत आकशात नेतात. ही काल्पनिका आहे अशी टीका काही तर्क्बद्ध विचार करणार्यांनी केली होती. पण तो जीवनाला आवश्यक असा कल्पनाविलास आहे. वास्तवाच्या पायावर उभी असलेली काल्पनिका ही माणसाला जगण्याचे बळ देऊ शकते. येथे दु:ख आणि वेदना यांच्या अस्तित्त्वाला आव्हान असते. या आव्हानातून निर्माण होतो तो निखळ आनंद जो विश्वाच्या सीमारेषा ओलांडून सर्वदूर पसरत जातो. हे चित्रपट पाहिले नसतील तर अवश्य पहा, पाहिले असतील तर पुन्हा पहा आणि या आनंदाच्या झऱ्यात सचैल स्नान करा...

‘-असे आपल्याही मनात झुळझुळणारे चित्रपट ‘आनंदाचा झरा’ वाचताना आठवतील आणि पाडळकर यांनी ज्या चित्रपटाविषयी आनंदाने व अभ्यासपूर्ण लिहिले आहे तेही पाहण्यास आपल्याला निश्चितच प्रवृत्त करतील
--- प्रतिभा सराफ ‘ललित’-लक्षवेधी पुस्तके (एप्रिल २०२१)