अर्पणपत्रिका :
यक्ष’ नावाच्या जिवलग वास्तूस-
मला क्षमा कर. तुला सोडून मला जायचे नव्हते.
मी तुला विसरलेलो नाही, विसरणारही नाही

बंगाली साहित्याला महान लेखकांची फार मोठी परंपरा आहे. या लेखकांत विभूतिभूषण बंद्योपाध्याय यांचे अनन्यसाधारण स्थान आहे. बंगालमध्ये एकही सुशिक्षित व्यक्ती अशी नसेल की जिने विभूतीभूषण यांची ‘पथेर पांचाली’ ही कादंबरी वाचली नसेल. बंगाली मुलांना तर वाचनाचा रस्ता सापडतो तो ‘पथेर पांचाली’ची मुलांसाठीची आवृत्ती वाचल्यानंतरच.
सुनील कुमार चटोपाद्याय यांनी लिहिले आहे ‘विभूतीभूषण यांना वगळून आम्ही बंगाली लोक आमच्या बालपणाची कल्पनाही करू शकत नाही.’
विभूतीभूषण यांच्या या कादंबरीला त्यांच्या बालपणाचा भक्कम आधार आहे. आपल्या जीवनालाच कल्पिताची जोड देऊन बंगाली जनजीवनाचे विलक्षण हृद्य चित्र त्यांनी रेखाटले आहे. बंगालमध्ये अनेक कथा-कीर्तनकार गावोगाव फिरून रामायण महाभारतातील कवने गात असत. ‘पांचाली’ म्हणजे गाण्यांची मालिका. या परंपरेच्या स्मरणार्थ लेखकाने या कादंबरीचे नाव ‘पथेर पांचाली’ असे ठेवले.

ही कादंबरी निश्चीन्दिपूर या गावातील, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील, सामान्य माणसांच्या जीवनाचे चित्रण करणारी असली तरी आजही विलक्षण ताजी वाटते. ती परकी वाटत नाही. जणू भूतकाळात नेणारी एक वाट कुणी शोधून आपल्यासमोर आणली आहे आणि आपण त्या वाटेवरून चालत आहोत असे जाणवत राहते. दुर्गा नावाची एक मुलगी झाडाखालाचे आंबे वेचत असते, अपू नावाचा तिचा भाऊ पक्ष्यांचे गाणे ऐकत असतो, दूर कुठे आगगाडीची शिटी होते, गवत वाऱ्यावर डोलत असते. मुले आपली खेळणी आपणच बनवीत असतात व रात्री त्यांना काय खायला द्यावे याची चिंता आईला पडलेली असते. बहीण भाऊ पावसात चिंब भिजून नाचतात आणि समोरच्या रस्त्यावरून थेट गेलो तर कर्णाला भेटू असे अपुला वाटत असते. कुणी नाईलाजाने या जगातून निघून जाते व कुणाची पावले नव्या रस्त्याकडे वळतात.
मूळ कादंबरी अतिशय लोकप्रिय झाली. रवींद्रनाथ टागोरांनी तिच्याबद्दल लिहिले, ‘या पुस्तकातून मी नवे काही शिकलो नाही. पण हे पुस्तक वाचून मी अनेक गोष्टी नव्या व ताज्या दृष्टीकोनातून पाहिल्या.’ या कादंबरीत असंख्य पात्रे असली तरी कथानक प्रामुख्याने दुर्गा व अपू या मुलांभोवतीच फिरते. हे लक्षात घेऊन विभूतीभूषण यांनी तिची मुलांसाठी एक सुटसुटीत आवृत्ती तयार केली व तिचे नाव ‘आंब्याच्या कोयीची पुंगी’ असे ठेवले. ती आवृत्ती देखील प्रचंड लोकप्रिय झाली. आजवर तिच्या सुमारे चाळीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

१९४३ मध्ये मुलांसाठीच्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करण्याचे काम प्रकाशकाने हाती घेतले तेव्हा या पुस्तकासाठी चित्रे काढण्याचे काम त्याने एका बावीस वर्षांच्या तरुणावर सोपविले. त्याचे नाव सत्यजित राय. ही चित्रे काढता काढता तो तरुण या कथेच्या प्रेमातच पडला. ती त्याच्या मनात इतकी रुतून बसली की त्यानंतर नऊ वर्षांनी जेव्हा त्याने आपला पहिला चित्रपट तयार करण्यास घेतला तेव्हा त्यासाठी हीच कथा निवडली. एवढेच नव्हे तर या कादंबरीसाठी काढलेल्या चित्रांवरून त्याने आपल्या सिनेमातील अनेक प्रसंगांची रचना केली.
मी शांतिनिकेतनमध्ये गेलो असता ही मुलांसाठीची आवृत्ती अगदी योगायोगाने माझ्या हाती पडली. मला बंगाली येत तर नाही पण राय यांच्या चित्रांनी एवढी मोहिनी घातली की मी ती कादंबरी विकत घेतली. मग तिचा इंग्रजी अनुवाद कुणी केला आहे का याचा शोध सुरू केला. दोन वेगवेगळ्या लेखकांनी केलेले अनुवाद मिळाले. मूळ प्रौढासाठीच्या कादंबरीचा अनुवाद माझ्याजवळ होताच. या तिन्हींचा उपयोग करीत मी महाराष्ट्रीय मुलांसाठी तिचा मराठी अनुवाद केला आहे.
या पुस्तकात मुलांचे रम्य बालपण आहे, सुंदर भविष्याची आशा आहे, जवळ खेळणी नसतील तर आपली खेळणी आपणच बनवावी असा संदेशही आहे. अडचणी, संकटे तर येत असतातच, पण त्यामुळे खचून न जाता सतत पुढे जाण्याच्या धडपडीतच जीवनाचे सार्थक असते हे मुलांच्या मनावर कोरणारी ही कलाकृती आहे.
प्रत्येक सुजाण पालकाने वाचावे व आपल्या मुलाला वाचण्यास द्यावे असे हे पुस्तक आहे.