अर्पणपत्रिका :
आद्य कविश्रेष्ठ वाल्मिकीस.
तुम्ही लावलेल्या वृक्षाची असंख्य पाने
माझ्या मनात सतत सळसळत असतात
आद्य कविश्रेष्ठ वाल्मिकीस.
तुम्ही लावलेल्या वृक्षाची असंख्य पाने
माझ्या मनात सतत सळसळत असतात
जग म्हणजे दवबिंदू?
असेलही
तरीही.
असेलही
तरीही.
हायकू ही एक पायवाट आहे. या वाटेला पुढे अनेक रानवाटा फुटतात. वाटेवरले गवत तुम्हाला एका दिशेने घेऊन जाते, त्यावर उडणारे फुलपाखरू दुसऱ्या दिशेकडे खुणावत असते...पर्वत शिखरावरील मंदिरातील विशालकाय घंटे वर एक फुलपाखरू निवांत झोपलेले असते.
हायकूच्या वाटेवरून चालल्यानंतर आपण पूर्वीचे उरत नाही.
हायकू हे लघु कवितेचे एक रूप. जपानी हायकूला १७ ‘ओन’ची मर्यादा असते. ‘ओन’ हे जपानी भाषेत ‘उच्चारांचे एकक’ आहे. मराठीत असे एकक नाही, जपानी हायकूत ‘Kireji’ [विभागणारा शब्द] अशी एक संकल्पना आहे. हायकू मधील १७ ओन हे सहसा तीन भागात ५-७-५ असे विभागले जातात आणि हायकू हा सरळ एका ओळीत लिहिला जातो. पहिल्या किंवा दुसऱ्या विभागाच्या शेवटी Kireji ची योजना केली जाते, व दोन विभागातील संबंध अधोरेखित केला जातो. इंग्रजी किंवा मराठी हायकू सामान्यपणे तीन ओळीत विभागून लिहिला जातो.
या तीन ओळींत, सामान्यपणे दहा शब्दांत एक संपूर्ण भावस्थिती वाचकासमोर उभी करणे हे हायकूचे प्रधान वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षरत्त्वाचा आग्रह असल्यामुळे येथे विस्तारला मज्जाव आहे. जे मांडावयाचे आहे ते अत्यंत कमी शब्दात, जवळजवळ सूत्ररूपाने मांडण्यावर हायकूकर्त्याचा भर असतो.
सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे हायकूच्या आकलनासाठी आणि आस्वादासाठी वाचकाचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. हायकू वाचल्यानंतर, ‘हे काहीतरी अवघड दिसते आहे’, किंवा ‘हे काही समजले नाही’ अशी त्वरित कमेंट करून पुढे सरकत गेले तर हायकूच्या विश्वात तुम्हाला कधीच प्रवेश मिळणार नाही. असे करणे म्हणजे काठावर बसून समुद्राची कल्पना करणे होय. कुठल्याही कलाकृतीच्या आस्वादासाठी मनाची स्वागतशील अवस्था अत्यावश्यक असते. हायकूच्या संदर्भात तर जास्तच. हायकू हे निवांतपणे, ‘चित्ती हळुवारपणा’ आणून, एकट्यानेच वाचायचे असतात. जी. एं.नी ‘पिंगळावेळ’ च्या सुरुवातीला टाकलेले अवतरण आठवते-
‘Stranger, think long before you enter,
For these corridors amuse not passing travelers.’
सहज जाताजाता चार हायकू वाचू असे म्हणून हायकू वाचता येत नाहीत.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत विजय पाडळकर लिहितात-
२०१६ साली अमेरिकेत गेलो असताना फक्त हायकू या काव्यप्रकाराचा अभ्यास केला. भारतात येताना तेथे वाचलेल्या सुमारे ३००० हायकू पैकी ५०० हायकूंची निवड केली व ते घेऊन परत आलो. नंतर मी रोज फक्त एका हायकूचा अनुवाद करण्याचे ठरविले. सकाळी एक हायकू वाचायचा, दिवसभर तो मनात घोळवायचा आणि रात्री त्याचा अनुवाद करून एका फाईल मध्ये सरकवून द्यायचा. एक महिन्यानंतर लिहिलेल्या तीस हायकुंचे पुन्हा वाचन करायचे, त्यांत सुधारणा करायच्या आणि पुढे सरायचे. अशा प्रकारे अनुवादित केलेले सुमारे पाचशे हायकू या संग्रहात मी समाविष्ट केले आहेत.
दि. ६ जून २०१९ रोजी पुणे येथे ‘घंटेवरले फुलपाखरू’ या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या,
कवी कविता लिहितो हाच एक अनुवाद असतो. अनुवादात समरसता आणि एकरूपता असणे आवश्यक असते. जपान मधील तीन महा कवींच्या पाचशे हायकुंचा अनुवाद करणारे हे पुस्तक मराठी वाचकांसाठी मेजवानी आहे. अनुवादासाठी तर हे वाचायलाच हवे पण पाडळकर यांनी त्यांत विषद केलेल्या अनुवादानुभवासाठीही वाचायला हवे. हायकुंचे प्राणतत्त्व काय आहे हे समजावून सांगणारे व हायकू संदर्भातील आपली जाण समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. कुठेही बोजड नसणारी, साधी, प्रवाही अनलंकृत भाषा हे वैशिष्ट्य असणाऱ्या या अनुवादातून कवितेचे अंतरंग किती खोल असते हे वाचकाला जाणवेल. पाडळकर हे रुळलेला मार्ग सोडून पलीकडल्या वाटा धुंडाळणारे कविमनाचे लेखक आहेत.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत असताना विजय पाडळकर म्हणाले,
हायकूंचे अनुवाद करण्यापूर्वी, आणि करीत असताना, हे काम किती कठीण आहे हे माझ्या ध्यानात आले. हायकूचा अनुवाद जर एवढा अवघड असेल तर मग तो का करावा? याचे एक उत्तर असे की जे आपल्यापर्यंत आले ते इतरांपर्यंत पोचविण्याची एक अनिवार उर्मी माझ्यात आहे. दुसरे असे की हायकू वाचताना मला जो आनंद मिळाला तो मनातल्या मनात त्यावर चिंतन करताना द्विगुणीत झाल्यासारखा भासत होता. अनेकदा वाटत होते की ही भावस्थिती आपल्या चांगलीच ओळखीची आहे. कधीकधी कसलाही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता काही प्रतिशब्द मनात तयार होत आणि कागदावर प्रकट होण्याची मागणी करीत. म्हणून मी हे अनुवाद केले. एका अनुवादकाने म्हटल्याप्रमाणे, ‘The feeling of knowing what is depicted, recognizing it, sharing it, is one of the satisfactions found in reading haiku.’
एक भावस्थिती मी अनुभवली आहे, तिचे प्रतिबिंब शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न. माझ्या ‘आत’ काय चालले आहे हे मी दाखवू शकलो तर ते पुरेसे आहे.”
इस्साचा एक हायकू आहे-
‘वसंतातील संध्याकाळ
मी एका मेणबत्तीने
दुसरी पेटवीत जातो’
हा अनुवाद म्हणजे एक प्रकारे 'दुसरी मेणबत्ती' पेटविण्याचा प्रयत्न आहे.
काही निवडक हायकू
आपण एकत्र पाहिलेला
बर्फच परत आलाय का? चंडोल पक्ष्यासाठी भलामोठा दिवसही अपुरा आहे गाणे म्हणण्यास दार उघडा चंद्राला येऊ द्या मंदिरात. काही काल सोडून गेले काही आज आता संध्याकाळी एकही बगळा नाही |
एकटा आहे
म्हणूनच कदाचित चंद्र अधिक जवळचा दोनच फुलझाडे पण किती दयाळू एक आता फुलतंय, एक नंतर दिवस किती मोठा आहे हे कारण पुरेसे होते म्हातारपणी डोळे पाणावण्यास जाऊ नकोस बगळ्या सगळीकडे तेच दु:खात तरंगणारे जग. |