गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे गाव‘अल्पसंख्य’ आणि ‘कवीची मस्ती’ या कादंबर्यानंतरची, आत्मशोधाच्या वाटेवरील प्रवासाचा वेध घेणार्या संकल्पित ‘कादंबरी चतुष्टयातील तिसरी कादंबरी.
आपला गतकाळ शब्दबद्ध करण्याची धडपड करणार्या एका लेखकाची कहाणी.
|
अल्पसंख्य‘अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणाऱ्या ‘त्याच न त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी, बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ‘अल्पसंख्य’ आणि ‘बहुसंख्य’ या दोन्ही प्रकारच्या तुमच्या आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी, कोणताही अभिनिवेश नसणारी सुंदर कादंबरी...
‘विचार करणारा माणूस हा ‘अल्पसंख्य’च असतो’ हे सत्य प्रभावीपणे मांडणारी, महाराष्ट्र शासनाचा ‘श्री. ना. पेंडसे’ पुरस्कार प्राप्त कलाकृती...
|
कवीची मस्ती ‘डॉन क्विझोट’ [आधुनिक उच्चार-किहोते] ही सर्वांतीस याची कादंबरी जगातील पहिली कादंबरी मानली जाते. ती एक महान आणि कालजयी कलाकृती आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. या कादंबरीचा जगभरच्या विचारवंतांवर आणि लेखकांवर प्रभाव पडला आहे. या कादंबरीतील ‘डॉन’ आणि ‘सांचो’ ही पात्रे या काळात आणि महाराष्ट्रात आली तर ती कोणत्या रूपात अवतरतील अशी विलक्षण संकल्पना घेऊन लिहिलेली ही कादंबरी. ही काल्पनिक असली तरी तिला वास्तवाचा भक्कम आधार आहे कारण ‘सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण असते.’
या जातीची कादंबरी मराठीत यापूर्वी कुणीही लिहिली नाही. - सुधीर रसाळ.
|