अर्पणपत्रिका:
दादासाहेब फाळके यांस ,
तुम्ही लावलेल्या ‘अंकूराची वाढ’ होत तो ‘वेलू गगनावेरी’ गेला आहे.

‘History will be kind to me for I intend to write it.’ Churchill
साहित्य आणि चित्रपट या दोन्ही विधांचा सखोल अभ्यास असलेले विजय पाडळकर यांचा ‘देवदास ते भुवन शोम’ हा नवा मौलिक ग्रंथ आहे. जगभरचे चित्रपट पाहण्याआधीच पाडळकरांना हिंदी सिनेमाची भूल पडलेली होती. ‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट’ मध्ये ‘फिल्म अॅप्रिसिएशन’चा कोर्स केल्यानंतर या आवडीला अभ्यास आणि विश्लेषण यांची जोड मिळाली. हिंदी चित्रपटांविषयी मराठीत भरपूर लेखन झालेले असले तरी हिंदी सिनेमाचा इतिहास पूर्वी कुणी सांगितला नव्हता. पाडळकर यांनी हा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी सुमारे २०० चित्रपटांच्या सी.डी. मिळवून ते चित्रपट त्यांनी पुन्हा पाहिले. त्यांच्याविषयीची माहिती मिळविली. या अभ्यासातून हिंदी सिनेमाचा विसाव्या शतकात विकास कसा झाला याचे रूप त्यांच्या मानत निर्माण झाले.
विजय पाडळकर यांनी या ग्रंथात सुमारे पंचाहत्तर हिंदी चित्रपटांचा अभ्यास सादर केला आहे. वेगवेगळ्या कालखंडात ह्या सिनेमाला कसे नवे नवे कलाकार मिळत गेले, त्यांनी कोणते प्रयोग सिनेमात केले आणि कलेची पालखी कशी पुढे नेली याचे तपशीलवार वर्णन या ग्रंथात वाचावयास मिळेल. ज्यांनी हे चित्रपट आधी पाहिले असतील त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद तर मिळेलच पण या चित्रपटाची पूर्वी ध्यानात न आलेली सौंदर्यस्थळे देखील त्यांना दिसतील. गॉसिपला मुळीच थारा न देता शक्यतो काटेकोरपणे हा इतिहास मांडला असल्यामुळे तो एक विश्वसनीय दस्तऐवज बनला आहे.
श्री पाडळकर हे सध्या ‘सारा आकाश’ ते ‘सत्त्या’ या हिंदी सिनेमाच्या दुसऱ्या खंडाचे काम पूर्ण करीत आहेत.
या ग्रंथाला ‘प्रसाद बन प्रतिष्ठान’ नांदेडचा ‘ग्रंथ गौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

या पुस्तकाबद्दल बोलतांना विजय पाडळकर सांगतात -
‘हिंदी सिनेमा हा तद्दन बाजारू आहे, नकली आहे अशी टीका केली जाते. मोठ्या प्रमाणावर ती खरीही आहे. पण मग त्यावर का लिहावयाचे? याचे उत्तर असे की या नकली मालाच्या भाऊगर्दीत कुठेतरी अस्सल सोने चमकून जाते. चौकटीबाहेर जाऊन काही वेगळे करण्याचा तर कधी या चौकटीत राहूनच तिला आगळी झळाळी देण्याचा प्रयत्न दिसतो. अनेक प्रतिभावंतांनी व्यावसायिक बंधने पाळूनही श्रेष्ठ कलाकृती दिल्या आहेत. या अस्सलपणाची नोंद घेणे सिनेमाचा अभ्यासक म्हणून मला गरजेचे वाटते. ‘यादें’ सारखा जगातील पहिला एकपात्री चित्रपट हिंदीत तयार झाला हे आज कुणाला माहीत आहे? ‘जागते रहो’, ‘भुवन शोम’ सारख्या चित्रपटांचे योग्य मूल्यमापन इथे झालेले नाही.
दुसरे म्हणजे चित्रपट ही विसाव्या शतकाची श्रेष्ठ कला असून देखील मराठीत तिचा अभ्यास फारसा झालेला नाही. चित्रपट समीक्षा हा साहित्य-समिक्षे इतकाच महत्त्वाचा विषय आहे हे मराठीत मी सर्वप्रथम मांडण्याचा प्रयत्न केला. [पण समीक्षकांनी तिकडे दुर्लक्षच केले.] अभ्यासकांसाठी खूप काही करण्यासारखे आहे. माझा हा ग्रंथ म्हणजे त्या दिशेने टाकलेले एक लहानसे पण आवश्यक पाउल आहे.
आयुष्याच्या एका वळणावर फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये Film Appreciation Course करीत असता जगभरच्या महान चित्रपटांचे स्तिमित करणारे दर्शन मला घडले. नंतर चित्रपट कलेचा गांभीर्याने अभ्यास करीत असता हिंदी सिनेमाचे खुजेपण मला सतत खिन्न करीत राहिले. हिंदी सिनेमाने जागतिक पातळीवर फारसे काही करून दाखविलेले नाही ही वस्तुस्थिती आहे, आणि खंतही. मात्र हे लेखन करताना मनात आशा आहे की भावी काळात, कधीतरी, हिंदी सिनेमाला सत्यजित राय सारखा महान कलावंत मिळेल. स्वप्न पाहायला काय हरकत आहे?
हिंदी सिनेमाने तेवढे निश्चितच शिकविले आहे.’