Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

शेक्सपिअर आणि सिनेमा

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...

प्रकाशक  : मौज प्रकाशन, मुंबई

प्रथमावृत्ती: २०१६

किंमत: २५०/-

पृष्ठे: २३२
मुखपृष्ठ व मांडणी  : नयन बाराहाते
 अर्पणपत्रिका : डॉ. सुधीर रसाळ यांना...
 Do not go where the path may lead, go instead where there is no path, and leave a trail. -R. W. Emerson
शेक्सपिअर हा जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार समजला जातो. सामान्य वाचकांपासून ते अभिजात कलावंतांपर्यंत, लेखकांपर्यंत, तत्त्वचिंतकांपर्यंत असंख्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याच्या नाटकांची मोहिनी जगभरातील महान चित्रपट दिग्दर्शकांवर देखील पडलेली असून त्याच्या नाटकांवर आजवर चारशे पेक्षा अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. शेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयशाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा तौलनिक अभ्यास करणारा हा ग्रंथ विजय पाडळकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. शेक्सपिअरची ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लियर’ ही नाटके आणि त्यावर आधारित चित्रपट यांच्यातील साम्य-भेदांचे विश्लेषण त्यांनी या ग्रंथात केले आहे.
 २०१६ साली जगभर शेक्सपिअरची चारशेवी पुण्यतिथी साजरी केली गेली. हे औचित्य साधून प्रकाशित झालेल्या या ग्रंथात  गेल्या पंधरा वर्षांपासून पाडळकर  करीत असलेल्या साहित्य आणि चित्रपट या दोन कलांच्या सखोल अभ्यासाचे प्रतिबिंब पडलेले दिसेल.
या पुस्तकाबद्दल बोलतांना विजय पाडळकर सांगतात -

‘शेक्सपिअर हा एक समुद्र आहे याची जाणीव मला त्याच्या नाटकाच्या चित्रीकरणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने शोध घेऊ लागलो तेव्हा झाली. अकिरा कुरोसावा चा ‘थ्रोन ऑफ ब्लड’ हा चित्रपट पाहत असताना प्रथम मला नाटक आणि सिनेमा यांतील साम्य व भेद हा अभ्यासाचा विषय आहे हे जाणवले. ‘मॅकबेथ’ या माझ्या आवडत्या नाटकाचे माझ्या मनातील अत्यंत व्यक्तिगत असे अर्थ निरूपण घेऊनच मी हा सिनेमा पहिला, व मला अनेक प्रश्न पडत गेले. नाटकाचे चित्रपटीकरण करताना मूळ नाटकात बदल करावा लागतो हे मान्य होते. पण हे बदल किती प्रमाणात करावे? कुरोसावाने जे बदल केले त्यामागे त्याची काही भूमिका आहे काय? ते बदल योग्य आहेत काय? त्यांच्यामुळे मूळ नाटकाच्या प्रभावात काही भर किंवा घट झाली का? कुठे दिग्दर्शकाने नाटकावर अन्याय केला असे जाणवले का? वगैरे असंख्य प्रश्न समोर उभे राहिले. त्यांचा शोध घेताना जाणवले की एकाच उदाहरणाने हे प्रश्न सुटणार नाहीत. अनेक नाट्यकृती व त्यावर आधारित चित्रपट पाहिले पाहिजेत. मग असे चित्रपट निवडून पाहणे  सुरू केले. मात्र या विषयावर मराठीत काहीही लिहिले गेलेले नाही. इंग्रजीत विपुल ग्रंथ आहेत पण ते वाचावयास मिळणे दुरापास्त आहे.

२०१० साली अमेरिकेस जाण्याचा योग आला. माझा मुलगा न्यूयॉर्कच्या वाचनालयाचा सदस्य असल्यामुळे आता वाटेल तितकी पुस्तके मला उपलब्ध होऊ शकत होती. त्या पाच महिन्यांत मी अनेक ग्रंथांचे वाचन केले. नाटक आणि चित्रपट हा विषय फार प्रचंड आहे हे ध्यानात आल्यावर मी अभ्यासाची कक्षा ‘शेक्सपिअरची नाटके व त्यावरील चित्रपट’ एवढी मर्यादित केली. तरीदेखील या विषयाची व्याप्ती अफाट आहे, कारण शेक्सपिअरच्या नाटकांवर चारशेहून अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत.

प्रस्तुत पुस्तकाच्या पूर्वार्धात ‘नाटक आणि चित्रपट : तौलनिक अभ्यासाच्या काही दिशा’ असा विस्तृत लेख दिला आहे. यानंतर मी शेक्सपिअरपटांचा गेल्या १०० वर्षांतील इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेतला. वेगवेगळ्या कालखंडात निरनिराळे दिग्दर्शक त्याच्या नाटकांचा कसा वेध घेऊ पाहत होते हे यावरून ध्यानात येते. नंतरच्या प्रकरणांत कवीची मुख्य दोन शोकात्म नाटके ‘मॅकबेथ’ आणि ‘किंग लीअर’ व त्यांवर आधारित चित्रपटांचा अभ्यास सादर केला आहे.

या पुस्तकाच्या संकल्पित दुसऱ्या खंडात शेक्सपिअरच्या आणखी तीन शोकात्मिकांचा आणि त्यांवर आधारित चित्रपटांचा विचार केला जाईल.’

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क