Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी

1/11/2026

0 Comments

 
Picture
हायकूकडे जाणार्‍या पायवाटेला पुढे अनेक रानवाटा फुटतात. वाटेवरले गवत तुम्हाला एका दिशेने घेऊन जाते, त्यावर उडणारे फुलपाखरू दुसर्‍या दिशेला खुणावत असते, कोकिळेची साद तिसर्‍याच रस्त्याकडे बोलावते. दूर कोठेतरी हरिण ओरडते. समोरच्या पर्वताच्या दिशेने एक गोगलगाय हळूहळू सरकत असते. शेजारच्या फांदीवर एक कावळा येऊन बसतो आणि फांदी थरथरते. मंदिरातील विशालकाय घंटेवर एक चिमणे फुलपाखरू निवांत झोपलेले असते. एका वाटेवर पावलांच्या खुणा दिसतात आणि पुढे चालून त्या ज्या तळ्यात विलीन होतात त्या तळ्याच्याकाठी एक बेडूक ध्यानस्थ बसलेला असतो.  ते असते हायकूचे तळे!
 एकदा या तळ्यापाशी मी आलो आणि  येथेच बसलो. ध्यानस्थ वगैरे नाही तर तळ्यात काय काय दडलेले आहे याचा शोध घेत. या शोधात जे माझ्या हाती आले ते कवितेच्या रसिक वाचकांना वाटण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या लेखनातून मी वाचकांना जगातील उत्तमोत्तम हायकू कवींची, त्यांच्या जीवनातील काही अर्थपूर्ण व रंजक घटनांची ओळख करून देणार आहे. शिवाय या ब्लॉगमध्ये हायकुच्या विश्वात सर्वोत्तम समजल्या जाणार्‍या हायकूंचे रसग्रहणदेखील असेल. आणखीही बरेच काही. ‘हम अभीसे क्या बताएं क्या हमारे दिल में है’!
 ह्या ब्लॉगसाठीचा पहिला लेख आज, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारी रोजी प्रकाशित करीत आहे. पुढील लेख आठवड्याला दोन याप्रमाणे दर रविवारी व बुधवारी येथे ठेवले जातील.
 नुकतेच माझे ‘हायकूऋतू’ हे हायकूंचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या निमित्ताने अनेक मित्रांशी बोलताना माझ्या ध्यानात आले की बहुसंख्य उत्तम वाचकांना देखील या काव्यप्रकाराविषयी फारच थोडी माहिती आहे. हायकूविषयी समज कमी आणि गैरसमजच जास्त आहेत.  यासंदर्भात आपण पुढे बोलूच, आता एवढेच: ‘हायकूच्या वाटेवरून चालल्यानंतर आपण पूर्वीचे उरत नाही.’
 ज्याचे कवितेवर प्रेम आहे त्याने हे लेखन अवश्य वाचावे, समानधर्मियांना त्याविषयी सांगावे.

Picture
Picture
0 Comments
Forward>>

    विजय पाडळकर

    Archives

    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क