Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी - 4: हायकूविषयी आणखी थोडे

2/18/2026

4 Comments

 
 [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे
गेल्या ब्लॉगमध्ये  आपण हायकूची व्याख्या व रूपाकार याबद्दल पहिले. या संदर्भात ‘हायकू ऋतु’ या समूहावरील अनेकांनी विचारणा केली की हायकुची नेमकी व्याख्या काय करता येईल. मी काही व्याकरणतज्ज्ञ नाही, पण सर्वसाधारणपणे मी हायकूची ही व्याख्या करू इच्छितो- 
“हायकू ही अल्पाक्षरी कविता अर्थपूर्ण शब्दांची पुनर्रचना करून एका क्षणाचे अनन्यसाधारणत्व प्रभावीपणे मांडते. हायकू ही तीन ओळींची, अल्पाक्षरी, अक्षर मर्यादेचे बंधन नसलेली लघुकविता असते जी एका श्वासात वाचता किंवा सांगता आली पाहिजे. या तीन ओळीत यमक नसले तरी चालेल पण त्यांना एक लय मात्र असली पाहिजे. सूचकता हा हायकूचा प्राण आहे. हायकू कविता ‘एका क्षणाबद्दल’ काही सांगू पाहते. मात्र ती त्या क्षणाशी बद्ध नसावी.  हायकू हा जवळ आणि दूर, समोर आणि पार्श्वभूमीला, भूतकाळ आणि वर्तमानकाळ, ध्वनि आणि शांतता, क्षणभंगुरत्व आणि दीर्घकालीन अस्तित्त्व अशी जीवनाची द्वैती रूपे दर्शविणारा असतो.”
अर्थात कोणत्याही व्याख्येसंदर्भात मतभेद होतात तसे या व्याख्येसंबंधीही होऊ शकतात. माझेच बरोबर असा आग्रह हायकू कुणीही धरू नये. 
आपल्या
समूहावरील चर्चेतून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे ‘हायकूत आताचा क्षण’ असलाच पाहिजे ही संकल्पना बरीच रूढ झालेली आहे. [मीही बराच काळ ती मान्य केली होती. पण हायकूविषयी आधुनिक अभ्यासकांची जी मते माझ्या वाचण्यात आली, आणि जे श्रेष्ठ हायकू मी वाचले  त्यावरून माझे मत थोडे बदलले आहे. 
हायकू मराठी रसिकांना हायकूची ओळख करून देण्याचे श्रेय शिरीष पै यांचे. [पै यांच्या बद्दल एक स्वतंत्र लेख मी लिहिणार आहेच.] शिरीष पै यांचे समग्र हायकू पॉप्युलर प्रकाशनाने ‘हायकू हायकू हायकू’ या नावाने प्रकाशित केले आहेत. त्यांत शिरीष पै यांच्या एका प्रस्तावनेचा संक्षिप्त भागही दिला आहे. त्या प्रस्तावनेत शिरीष पै लिहितात –
‘1963 साली सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर ह्यांनी एके दिवशी माझ्या हातात हायकूंचा एक सुंदर संग्रह ठेवला व ते म्हणाले, “आधी नाही...नंतर नाही...फक्त आताचा क्षण... त्या क्षणाची कविता म्हणजे हायकू.”’
शिरीष पै यांनी मराठीत हायकू लोकप्रिय करण्यासाठी जे काही कार्य केले ते अतुलनीय आहे. त्यामुळे हायकूंच्या संदर्भात त्यांचा शब्द एकेकाळी अंतिम मानला जात होता. मात्र अनेकांनी ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजे हायकू’ याचा अर्थ ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजेच हायकू’ असा लावला. त्याविषयी थोडे लिहिणे आवश्यक आहे.  हायकूत ‘आताच्या क्षणाला महत्व असते’ हे मान्य मात्र ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजेच हायकू’ असे म्हणता येणार नाही. आताचा क्षण वगळूनही उत्तम हायकू लिहिता येऊ शकतात, लिहिले जातात. उदाहरणार्थ जपानचा श्रेष्ठ कवि ईस्सा याचा एक गाजलेला हायकू असा आहे - 
दिवस किती मोठा आहे 
हे कारण पुरेसे 
म्हातारपणी डोळे पाणावयास
किंवा बुसोन याचा एक हायकू असा आहे-
चंद्र असा आहे की-
चोरानेही थांबावे 
आणि गाणे गावे
आता या हायकूंत ‘आताचा क्षण’ कोठे आहे?  आताच्या क्षणासंबंधी हायकू अवश्य लिहावा [कारण आताच्या क्षणात आपण अधिक तीव्रतेने व उत्कटतेने सामील झालेलो असतो] पण याव्यतिरिक्तही हायकू लिहिता येतात हे ध्यानात ठेवावे.    
जपानी संकल्पनेप्रमाणे श्रेष्ठ हायकूत खालीलपैकी एक किंवा दोन आशयसूत्रे असणे आवश्यक आहे. 
‘जीवनातील अपूर्णता, एकाकीपणातील सौंदर्य, क्षणभंगुरतेची जाण आणि नश्वरता हे आयुष्याचे मूलभूत सत्य आहे ही जाणीव, जीवनातील लाभाविषयी
उदासीनता व उत्कट भावनिक प्रतिसाद. जीवनाचा अर्थ शोधण्याची धडपड कवीच्या आत्म्यात असली पाहिजे.’
हायकूत निसर्ग असलाच पाहिजे अशी सक्ती करता येणार नाही; तरीही मला वाटते की हायकूमध्ये निसर्ग आला तर उत्तमच.. निसर्ग हा हायकूचा प्राण आहे. काही हायकू निसर्ग  या विषयाव्यतिरिक्त लिहिण्यास हरकत नाही, तसे हायकू लिहिले जातातही. निसर्ग हा प्राण आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे माणसा-माणसाच्या नात्यापेक्षाही माणसाचे  निसर्गाशी असलेले नाते फार वेगळे आहे. ते सनातन तर आहेच; पण तेथे माणूस थोडा शरण्यभावनेने, निसर्ग आपल्याला काही देईल या भावनेने जातो. म्हणून हायकूत निसर्ग यायला हवा. अर्थात हायकूत निसर्ग येताना तो स्पष्टपणे न येता प्रतिमांच्या भाषेत यावा.  हायकूत निसर्गाचे केवळ वर्णन नसावे. चांगल्या कवितेतप्रमाणे प्रतिमा हाही हायकूचा प्राण आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हायकू लिहिताना कवीची मन:स्थिति हायकूसाठी पोषक झाली पाहिजे, आणि निसर्ग या बाबतीत माणसाची सर्वाधिक मदत करू शकतो. कवीने निसर्गाकडे वळले पाहिजे. पण एवढेच पुरेसे नाही; निसर्गालाही आपल्या आत प्रवेश करू द्यायला हवा. 
 कवी एक निसर्ग दृश्य पाहतो, तो वर्तमान क्षण आणि त्यासोबतचा तपशील देखील त्याचे मन टिपून घेते. त्यांच्याशी त्याचे एक नाते निर्माण होते. गद्य लेखन करताना अनुभवापासून थोडे तरी अलिप्त, वेगळे होण्याची गरज असते. हायकू-कवी त्या अनुभवात इतका खोल खोल जात राहतो की एका क्षणी तोच अनुभव बनतो.
हायकूमध्ये प्रतिमांच्या साह्याने कवी आपले म्हणणे सूचित करू पाहतो,  हायकूचा निश्चित अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत  नाही. ही संदिग्धता हायकूचे सौंदर्य वाढविते. शेवटी श्रेष्ठ कला ही कलावंताचा अनुभव दर्शविते, त्याने वर्णन केलेली वस्तू नव्हे. त्यामुळेच हायकूत अधिक तपशीलवार वर्णनाला जागा नसते. कवी हायकूत शब्दांचा उपयोग शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी करतो.
अनुभवातून गेल्यानंतर त्याच्या मनात पुढली प्रक्रिया सुरू होते. कवीच्या मनात काही जुन्या आठवणी असतात, संस्कार असतात, त्यांच्या प्रकाशात कवी हे तपशील निरखू लागतो. ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. या मंथनातून एक पुसटसा आकृतीबंध तयार होतो. तो कवीला अस्वस्थ करतो आणि तो शब्दांतून मांडण्याची अनिवार उर्मि त्याच्या मनात निर्माण होते. शब्द स्मृतीत साठवलेले असतातच, आता त्यांतून नेमके शब्द शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेची पुढली पायरी म्हणजे जे शब्दातून व्यक्त करायचे आहे त्याचा ‘घाट’ ठरविणे. हा अनुभव हायकूतून व्यक्त होऊ शकेल की त्यासाठी दीर्घ कविता लिहावी लागेल हे ठरविणे. ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते कारण हायकू लिहावयचे म्हणजे त्याचे अल्पाक्षराचे बंधन पाळावे लागते. आता शब्दांच्या वेगवेगळ्या छटा कवी न्याहाळू लागतो. त्याच्या कष्टाच्या मदतीला त्याची प्रतिभा येते व एका क्षणी हायकूचा जन्म होतो. हा क्षण केव्हा येईल याची कवीलाही कल्पना नसते. 
हायकू हा उस्फूर्त असतो असाही एक समज आहे, मात्र  अनेक मोठ्या कवींनी आपले हायकू पुन्हापुन्हा तपासून नव्याने सादर केल्याचीही उदाहरणे आहेत. कोबायाशी ईस्साने हायकू लिहिल्यावर तीन चार वर्षांनी ते ‘दुरुस्त’ केलेले जाणकारांनी दाखविले आहेत. 
R H Blith या अभ्यासकाने ‘हायकू म्हणजे क्षणिक साक्षात्कार’ असे म्हटले आहे. [expression of temporary enlightenment]. मात्र  हायकूचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तो क्षणिक व कालातीत यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो. आयूष्य हे या क्षणाला सुरू झाले नाही किंवा संपणारही नाही, हा क्षण ही काळाच्या साखळीतील एक कडी आहे हे उत्तम हायकूकार जाणतो, व ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.
​
या मालिकेतील पुढील लेखात आपण हायकूमधील रसिकाच्या/ वाचकाच्या सहभागाबद्दल विचार करणार आहो. 
4 Comments
शरद तरडे
2/21/2026 06:58:32 pm

खूप सुंदर रितीने तुम्ही सोप्या भाषेत व्यक्त करून आम्हालाही हायकू च्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्द्ल आभार.

Reply
Angha
2/21/2026 07:13:24 pm

हायकू ची अगदी सर्वसमावेशक अशी व्याख्या वहीत नोंदवून घेतली. संपुर्ण लेख तर हायकूशी चांगली मैत्री करून देणारा आहे. हायूकचा घाट कसा ठरवता येतो. तसेच सर्वोत्तम हायकू कोणते कोणते, ते सर्वोत्तम का मानतात इत्यादी बाबत उत्सुकता लागून राहीली आहे आता.
ईस्साचा हायकू हळवा करत प्रेरणा देतो म्हातारपणात उमंग कसा भरता येईल हे पहावे यासाठी.
बुसोनचा हायकू वाचून वाटले की, चंद्र इतका अद्भूत वेड लावून जागच्या जागी थांबायला लावतो. मनास सूर देतो. हे खरे पण त्याची चोरी आपणास करावी वाटतेच. त्यामुळे चोर नसणारा माणूसही चोरीच्या हव्यासात पडतो खरे तर. तिथे चोरांनी थांबावे ऐवजी 'मारक-यानी' थांबावे असे असायला हवे होते असे मला वाटले.
आपण लिहलेले घंटेवरील फुलपाखरू वाचून झाले की आता शिरीष पै यांचे हायकू हायकू हायकू मिळवून वाचून काढायचे असा बेत मनाने ठरविला आहे. या हायकू ऋतूत हायकूवर प्रेम जडविण्याची शक्यता आपण वाढवित नेत आहात. आभार!

Reply
Deepali datar
2/22/2026 01:10:02 am

फारच छान विवेचन.

Reply
Tukaram Pundlik Khillare
2/22/2026 03:28:24 am

क्षणाविषयी छान विवेचन.

Reply

Your comment will be posted after it is approved.


Leave a Reply.

    विजय पाडळकर

    Archives

    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क