Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी 21: चियो-नी

8/16/2026

0 Comments

 
Picture
जपान मधील श्रेष्ठ हायकूकारांचा उल्लेख करताना जे जाणकार अभ्यासक आहेत ते आद्य हायकुकार बाशो याच्या जोडीने ‘चियो-नी’ या हायकू कवयित्रिचाही उल्लेख करतात. ‘पुरूषत जसा बाशो तशी स्त्रियांत चियो-नी असेही म्हटले जाते. मात्र तिच्या काळात [1703 -1775] जपानमध्ये स्त्रियांना मुळीच मान दिला जात नव्हता. त्यांच्यावर अनेक बंधने होती. त्यामुळे जरी तिच्या हयातीत तिची कविता लोकप्रिय बनली होती तरी  तिच्याविषयी खात्रीलायक माहिती फारच थोडी लिहून ठेवलेली आढळते. 

चियो-नी चा जन्म 1703 साली ‘White Mountain’ च्या पायथ्याशी असलेल्या मातो या गावी झाला. हे गाव तेथील गोड पाण्यांच्या झर्‍यांसाठी प्रसिद्ध होते. तिचे मूळ नाव फक्त ‘चियो’ [सहस्र वर्षे] एवढेच होते. नंतर स्त्रियांच्यासाठी लावले जाणारे ‘jo’ हे suffix तिच्या नावापुढे जोडले जाऊ लागले. मात्र वयाच्या पन्नाशिनंतर तिने बुद्ध भिक्षू होण्याचा निर्णय घेतला व तो अमलात आणलाही. यानंतर तिने आपले नाव ‘चियो-नी’ [नी म्हणजे मठवासिनी] असे लिहिण्यास सुरुवात केली. 
 चियो-नी च्या बालपणाविषयी फारशी माहिती मिळत नाही. असे म्हणतात की वयाच्या सहाव्या वर्षीच तिने पहिला हायकू लिहिला. ‘माझ्या बागेत/फुले उमललीत/या आणि पहा.’ आणखी एका कथेप्रमाणे तिने सातव्या वर्षी लिहिले, ‘पहिले जंगली हंस /येत आहेत / येतच आहेत.’ कवितेकडे असणारा तिचा कल पाहून वडिलांनी तिला हानसुई या हायकू शिक्षकाकडे पुढील शिक्षणासाठी ठेवले. त्यावेळी ती फक्त 12 वर्षांची होती. या शिक्षकांनी तिला केवळ हायकूच नव्हे तर चीनी लिपि शिकवावी अशीही वडिलांची अपेक्षा होती. त्यामुळे ती उत्तम सुलेखन देखील शिकली. या सुमारासच ती चित्रेही काढू लागली. 

यानंतर तिने सोगोयास या मान्यवर कुटुंबात राहून साहित्याचे अध्ययन केले. या कुटुंबातील सुइजो नावाची एक मुलगी तिची घनिष्ठ मैत्रीण बनली. त्यांची मैत्री आयुशभर टिकली. पुढे चालून जेव्हा चियो-नी मोठी कवयित्रि बनली तेव्हा या सुइजोने तिचे शिष्यत्व पत्करले.      चियो-नी ने लग्न केले किंवा नाही याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. काही जणांच्या मते तिने लग्न केले होते, तिला मुलगाही झाला होता, पण लग्नानंतर दोन तीन वर्षांत तिचा नवरा व मुलगा दोघेही मरण पावले. मात्र कोठे या घटनांचा लेखी पुरावा मिळत नाही.

एवढे मात्र खरे की जर तिने लग्न केले असते तर त्या काळाच्या रूढीप्रमाणे तिच्यावर अनेक बंधने आली असती व तिला हायकूची आराधना करता आली नसती. वयाच्या पंचविशीत तिने पूर्णपणे हायकू लिहिण्याला वाहून घेतले. लवकरच तिचे हायकू वेगवेगळ्या प्रातींनिधिक काव्य संग्रहामध्ये प्रकाशित होऊ लागले. एक महत्त्वाची हायकू-कवि म्हणून तिचे नाव घेतले जाऊ लागले एवढेच नव्हे तर तरुण मुलेमुली तिला आपले हायकू दाखविण्यासाठी, तिचे मार्गदर्शन घेण्यासाठी तिच्याकडे येऊ लागली. क्योतो आणि इतर शहरात जे हायकू कवींचे मेळावे भरत त्यांना ती उपस्थित राहू लागली. अनेक वेळा या मेळाव्यात उपस्थित राहणारी ती एकमेव स्त्री हायकूकार असे. 

अशाच एका मेळाव्यात, एकदा एका कवीने चियो-नीला आव्हान दिले. ‘एकाच हायकूत एक चौकोन, एक त्रिकोण आणि एक वर्तुळ बसवून दाखव’. तिने हा हायकू लिहिला
मच्छरदाणी
एक कोपरा उचललेला
चंद्र पाहण्यास
मच्छरदाणीचा वरचा भाग चौकोनी, एक कोपरा उचलल्यामुळे त्रिकोण तयार झाला आणि चंद्राचे वर्तुळ! एकदा पौर्णिमेच्या दिवशी,  तिने तिचा आता प्रसिद्ध बनलेला हायकू वाचला होता-
चंद्राची कोर पाहिल्यापासून
वाट पाहते आहे
आजच्या रात्रीची
पौर्णिमेच्या चंद्राचा उल्लेखही न करता तिने त्याच्या सौंदर्याची महती गाईली आहे!
 
या ठिकाणी जपानमधील 18 व्या शतकातील सामाजिक रचना थोडी लक्षात घ्यायला हवी. त्याकाळी जपान मध्ये  स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात असे. त्यांना शालेय शिक्षण दिले जात नव्हते. त्यांना एकट्याने प्रवास करण्याची सुद्धा बंदी होती. मात्र चियो-निने उत्तम हायकुकार असा नावलौकिक मिळवला असल्यामुळे तिला बरेच स्वातंत्र्य मिळाले. [की तिने ते घेतले?] चियो-निची समाजात वावरतांनाची वागणूकही अनेकांना खुपत होती. ती पुरुषांमध्ये मिसळायची, त्यांच्याशी काव्य-शस्त्र-विनोद करायची, त्यांना मार्गदर्शन करायची. या वागण्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी तिच्याविषयी नाना अफवा पसरविण्यास सुरुवात केली. तिचे अनेक पुरुशांशी संबंध जोडण्यात आले.

वयाची तिशी उलटल्यानंतर चियो-नीच्या आयुष्यात अचानक अनेक दु:खद घटना घडण्यास सुरुवात झाली. प्तथम तिचे आईवडील वारले, नंतर तिचा भाऊ वारला, त्यानंतर वाहिनीही वारली. यामुळे तिचे हायकू लेखन थांबले नाही पण खूपच कमी झाले. 

कौटुंबिक अडचनींच्या या दिवसातच चियो-नीचे काही जवळचे स्नेही हे जग सोडून गेले. या काळात बुद्धाच्या नश्वरतेच्या तत्वाज्ञानाचा तिच्यावर फार मोठा परिणाम झाला. 1754 साली, वयाच्या 52 व्या वर्षी चियो-जो बौद्ध भिक्षुणी बनली आणि तिने चियो-नी हे नाव स्वीकारले

चियो-नीने जरी बौद्ध धर्म स्वीकारला होता तरी तिने एखाद्या मंदिरात राहून सेवा करण्याचे नाकारले. ती आपल्या घरातच राहून बौद्ध धर्माच्या शिकवणीप्रमाणे सन्यस्त आयुष्य जगू लागली. शिवाय भिक्षुणी होण्याचा तिला फायदा असा झाला की संसारी स्त्रीवर असणारी बंधने मानण्याची तिला आता आवश्यकता नव्हती. ती मुक्तपणे कोठेही फिरू शकत असे. ज्या दिवशी तिने आपले केस कापले त्या दिवशी तिने लिहिले-
‘मी जगाचा त्याग करीत नाहीय. पण त्याच्या नश्वरतेची जाणीव झाल्यामुळे मी दिवस आणि रात्री वाहणार्‍या ‘शुद्ध पाण्याच्या मार्गाने’ जाण्याचे ठरविले आहे.’ [बुद्ध विचारात ‘pure water’ किंवा ‘निर्मळ पाणी’ म्हणजे मनाला स्वच्छ करणारे  चिंतन, ज्याप्रमाणे ‘स्वच्छ पाणी’ हे शरीरावरची धूळ नाहीशी करते.] 
नन झाल्यानंतर तिचे हायकू हे अधिक चिंतनशील बनले. ​
पूर्ण चंद्र
डोळ्यात साठवून
निघाले दूरच्या प्रवासाला
आयुष्य हे नश्वर आहे’ ही बुद्धची शिकवण यानंतरच्या तिच्या हायकूत अनेकदा प्रकट होते.
स्वप्नाच्या उरलेल्या खुणा-
फुलपाखरू
फुलांच्या ताटव्यांतून हिंडणारे
पूर्व आशियामध्ये कविता, चित्रकला, व सुलेखनकला या तिंहींना मिळून एक कला मानले जाते. चियो-नी या तीनही कलात प्रवीण होती. जपानमध्ये सुलेखनाचा दृश्य परिणाम हा काव्याच्या साहित्यिक परिणामाइतकाच महत्त्वाचा समजला जातो. तिचे अनेक हायकू तिने अतिशय आकर्षक अक्षरात लिहिले आहेत आणि सोबत वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढली आहेत. या रचनेला हाइगा असे म्हटले जाते. 
याशिवाय तिने स्वत:ची चित्रेही काढली आहेत.

नन झाल्यानंतर चियो-नी हायकुच्या जगात अधिकच सक्रिय बनली. तिने स्वत:चे स्वतंत्र असे दोन हायकू संग्रह प्रकाशित केले. स्त्री हायकूकारासाठी ही नवीन घटना होती. तिच्या मृत्यूपर्यन्त तिचे हायकू शंभरहून अधिक वेगवेगळ्या प्प्रातिनिधिक काव्यसंग्रहात घेतले गेले होते. मात्र शेवटच्या पाच वर्षांत तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. 

​
जपान मधील हायकू कवींत अंत जवळ आल्यावर निरोपाचे हायकू लिहिण्याची प्रथा आहे. चियो-नीने लिहिले-  ​
मी चंद्र पाहिला
या जगाचा
आता निरोप
1775 साली वयाच्या बहात्तरव्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूची बातमी कळल्यावर अनेक तरुण कवींनी तिच्यावर कविता लिहिल्या. एकाने तिच्यासंदर्भात लिहिले, ‘हायकुच्या मार्गावरील प्रकाश हरवला आहे.’ 

चियो-नीने जवळजवळ 1700 हायकू लिहिले असे मानले जाते. मातो येथील शोकोजी मंदिरात तिने काढलेल्या चित्रांचे, आणि तिच्या खाजगी वस्तूंचे संग्रहालय आहे, आणि एका दगडावर तिच्या काही कविता कोरून ठेवल्या आहेत. 

तिच्या मृत्यूनंतर तिच्या हायकुंची लोकप्रियता अधिकच वाढली. जपानमध्ये अनेक चित्रकारांनी तिची चित्रे काढलेली आहेत, अनेकांनी तिच्यावर गीते लिहिली आहेत, नाटके लिहिली आहेत, एवढेच नव्हे तर तिचे हायकू लिहिलेले पत्त्याचे डाव देखील लोकप्रिय बनले आहेत. असे भाग्य फार थोड्या कलाकारांना मिळते.

0 Comments

Your comment will be posted after it is approved.


Leave a Reply.

    विजय पाडळकर

    Archives

    May 2026
    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क