|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] सर्वप्रथम हा ब्लॉग सुरू करण्यासाठी 1-2-2026 ही तारीख का निवडली याबद्दल. बरोब्बर 25 वर्षांपूर्वी, 1-2-2001 रोजी मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बँकेची नोकरी आनंदाने सोडून दिली. त्या दिवशी मी लिहिले होते-
आज 25 वर्षांनंतर हे थोडे भाबडे वाटते आहे, पण स्वप्न पाहताना माणूस थोडा भाबडा बनला नाही तर कसे? यातील बर्याच इच्छा पूर्ण झाल्या, काही झाल्या नाहीत. पण हा सार्यांचाच अनुभव असतो. एक इच्छा मात्र मनात कोठेतरी सुप्त रूपात होती, जी त्यावेळी ओठावर आली नाही. ती होती शब्दांना कधीतरी कवितेचे रूप मिळावे ही. काही दिवसांपूर्वी तीही पूर्ण झाली. हायकू माझ्या मनात वस्तीला आले.
त्यांच्या सोबत केलेल्या हायकूंच्या जगाच्या परिक्रमेची ही कहाणी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. पहिला टप्पा : पुढील रविवारी.
14 Comments
rajeev shrikhande
1/31/2026 08:34:03 pm
मस्त…🙏👍
Reply
Anagha
1/31/2026 09:17:16 pm
या तळ्याकाठी बसून निरीक्षण करताना आपली बहुमोल साथ आपण देत आहात, यात खरा आनंद आहे.
Reply
दीपाली दातार
1/31/2026 09:25:53 pm
वाह. छानच. जीव रमतोय या तळ्याकाठी.
Reply
विजय पाडळकर
2/1/2026 01:52:52 am
तळ्याकाठी येणाऱ्या प्रत्येकाचे हार्दिक स्वागत.
Reply
गौरी परचुरे
1/31/2026 09:38:13 pm
तळ्याकाठची नीरव शांतता ऐकायला नक्कीच आवडेल.
Reply
Himani
1/31/2026 10:07:46 pm
“एक रस्ता सोडला आता सारे रस्ते माझेच आहेत!” खूप सुंदर 👌.
Reply
विजय पाडलकर
2/1/2026 09:06:19 pm
स्वागत!
Reply
सुनील शिनखेडे
2/1/2026 01:02:29 am
वा! सर, तुमचं हे प्रांजळ कथन म्हणजे नितळ कविताच जणू! तुम्हाला जे वाटायचं, वाटतंय त्यातली कोवळीक आणि काव्य तुम्ही जगताय प्रत्यक्ष. दर रविवारी तुमच्या हायकूंच्या जगात रमायला नक्कीच आवडेल. त्या उत्सुकतेला आज कोंभ आला. पुढे पंख फुटतील. खूप शुभेच्छा.
Reply
Chitra Rajendra Joshi
2/1/2026 04:34:07 am
माझ्या वाचनाची सुरुवात खास करून दिवाळी अंक तुमच्या चारुलता वरच्या लेखाने झाली. 2004 सालच्या 'दीपावली'तला नष्टनीड या कादंबरीवरच्या चित्रपटाचा लेख 'विस्कटलेलं घरटं'. त्यानंतर 'नाव आहे चाललेली' हे पुस्तक. तसंच 'चंद्रावेगळं चांदणं' हे चित्रपटांवरचं पुस्तक. तसंच डॉन किहोते - 'मृगजळातील तळी'. ही तुमची पुस्तकं माझ्या वाचनाच्या सुरुवातीच्या वर्षांत वाचली आणि तुमच्या लेखनाची मी चाहती झाले. त्यानंतर तुमची 'वाटेवरले सोबती', 'गंगा आए कहांसे' आणि इतरही.
Reply
Chitra Rajendra Joshi
2/1/2026 05:06:05 am
(वरील अभिप्राय अर्धवट आल्याने पुन्हा देत आहे. आधीचा मला काढून टाकता येत नाहीये.)
Reply
विजय पाडलकर
2/1/2026 09:07:31 pm
स्वागत !!
Reply
Tukaram Pundlik Khillare
2/1/2026 05:10:27 am
छान उपक्रम. रविवारची मेजवानीच राहील.
Reply
vijay padalkar
2/1/2026 09:05:26 pm
धन्यवाद !
Reply
Jayant Ralerasksr
2/1/2026 08:43:23 am
हायकू बद्दल बरेच ऐकून तर होतोच. आता ओळख झाल्यासारखे वाटत आहे. हायकूची जन्मकथा आणि तुमच्या अंगणातला रहिवास याचे कुतूहल सुध्दा आहेच.
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed